टीम संवाद न्यूज :
प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या जीवन पैलूला आकार देणाऱ्या आठवणींची पुस्तक रुपी भेट " अक्षरे अश्रूंची" या नावाने येत आहे. तेजस प्रकाशन कोल्हापूर हे पुस्तक प्रकाशित करणार आहेत त्याची प्रकाशन पूर्व नोंदणी सवलतीच्या दरात उपलब्ध केली आहे.
प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी यांच्या आजवरच्या जीवन प्रवासात भेटलेली माणसं, त्यांचा लाभलेला सहवास आणि याचे त्यांच्या जीवनावर झालेले परिमाण आघात आणि आनंद असे अनुभव यात वाचायला मिळतील.
मराठीजनांचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल देशपांडे यांनी स्वहस्ते पाठवलेले पत्र हा अनमोल ठेवा हि आपल्याला पाहता येणार आहे. असे अनेक दिग्गज त्यांच्या आठवणीच्या रूपाने आपल्याला पुस्तकातून भेटतील हि संधी वाचकांनी साधून तेजस प्रकाशन कडे आपली नोंद करावी