मंगळवेढा:मंगळवेढा येथे अवजड वाहनांमुळे वारंवार होणारे आपघात टाळण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा पालखी मार्गावरती मंगळवेढा शहरामध्ये बोराळे नाका ते बायपास चौक पर्यंत गतिरोधक बसविण्यात आले आहेत ते गतिरोधक निकृष्ट दर्जाचे आहेत.
ते निकृष्ट दर्जाचे असणारे गतिरोधक बदलून चांगल्या दर्जाचे बसण्यात यावे या साठीचे निवेदन सप्तशृंगी मंडळातर्फे नगरपरिषदेला देण्यात आले.
तसेच पंढरपूर रोड येथील अवजड वाहतूक प्रतिबंधक कमान कमी उंचीची करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली.आश्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवेढा नगरपरिषद येथे देण्यात आले.
त्यावेळी निवेदन देताना सप्तशृंगी नगर येथील व चोखामेळा नगर येथील पदाधिकारी,कार्यकर्ते गावातील नागरिक उपस्थित होते.