आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

आ. समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन.

 
                        मंगळवेढा:पतंजली योग परिवार मंगळवेढा यांच्या वतीने मंगळवेढा पंढरपूर मतदार संघाचे लोकप्रिय व लाडके आमदार माननीय श्री समाधान (दादा) आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

                          जवाहरलाल शेतकी हायस्कूल मंगळवेढा येथे  मंगळवार  दिनांक २१ नोव्हेंबर पासून रविवार २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत सकाळी 5:30 ते 7:15 या वेळेत शिबिर घेण्यात येणार आहे. 

                 


       या शिबिरात आसन, प्राणायाम,धारणा,ध्यान,  ॲक्युप्रेशर, दिनचर्या, ऋतुचर्या, आहार इत्यादी विषयावर महाराष्ट्रातील नामांकित योगशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात मधुमेह, बीपी, संधिवात, पाठदुखी, गुडघेदुखी, हृदयरोग, लठ्ठपणा इत्यादी रोगांवर उपचार योग व आयुर्वेदाच्या माध्यमातून  उपचार केले जाणार आहेत. 

                          तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व आरोग्यप्रेमी व योगप्रेमी बंधू भगिनींनी या शिबिराचा लाभ घेत आपले आरोग्य अबाधित राखावे असे आवाहन  योगशिक्षक संतोष दुधाळ यांनी केले आहे.test banner