साखळी उपोषण स्थगीत करण्यासाठी आज मंगळवेढ्यात बैठक. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

साखळी उपोषण स्थगीत करण्यासाठी आज मंगळवेढ्यात बैठक.



                    मंगळवेढा:मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी व मराठायुद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करण्यासाठी दामाजी चौकात उपोषणस्थळी आज सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

                    कालच राज्य शासनाचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांना भेटल्यानंतर सदर बैठकीत पाटील यांनी कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी शासनाला २ जानेवारी २०२४ पर्यंत अर्थात २ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे सदर कालावधीत शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे तसेच महाराष्ट्रात मराठा बांधवांच्या वरती दाखल झालेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत,आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटूंबाला शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी अशा अनेक मागण्यांसाठी मुदतवाढ दिली आहे.

                    यावेळी पाटील यांनी समाजाशी चर्चा करूनच आमरण उपोषणाचे रुपांतर साखळी उपोषणात करण्याचा निर्णय घेतला आहे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मंगळवेढा येथे गेली सात दिवस साखळी उपोषण सुरू आहे.सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी कोणती भूमिका घेतली आहे व पुढील आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे.

                  याविषयी चर्चा करण्यासाठी व मंगळवेढयातील साखळी उपोषण स्थगित करण्यासाठी आज समाजाची बैठक बोलविण्यात आली आहे तरी सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.


test banner