मंगळवेढ्यात संविधान दिन साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

मंगळवेढ्यात संविधान दिन साजरा.



                     मंगळवेढा:भीमनगर येथे 26/11/2023रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संविधानाची उद्देशिका सामूहिक रित्या वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. 

                     या कार्यक्रमासाठीवारी परिवाराचे सुहास ताड,समर्थ महामुनी,हर्षद वस्त्रे, पवन टेकाळे,भारत नागणे,रोहित वाघ,सौरव मुढे,रोहन सूर्यवंशी,स्वराज कलुबरमे,पांडुरंग कोंडुभैरी,संजय जावळे,समीर गूंगे,प्रणव हेंबाडे,स्वप्निल फुगारे,विनायक कलुबरमे,सतीश दत्तू व भीम नगर येथील गणेश शीकतोडे मेजर, जुगल शेंबडे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजय गाडे,  युवक नेते अविनाश भैय्या शीकतोडे, माऊली सातपुते, समाधान शिंदे, खंडू घोडके, किशोर कसबे, अजित खंदारे, अजय अवघडे,D J आण्णा,प्रताप कांबळे, अॅड वैभव भेंडे, आण्णा लोकरे, अनिकेत खरबडे, गजानन लोकरे आधी समाज बांधव उपस्थित होते. 

                 


   यावेळी बोलताना प्रा.कलुबर्मे सर यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व दुर्गराज गड संवर्धन ऐतिहासिक असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड हा शिव काळामध्ये जशाप्रकारे होता अशा पद्धतीमध्ये त्याची उभारणी शासनाने करावी व महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची देखभाल करण्यात यावी यासाठी मंगळवेढा शहरातून गडप्रेमी यांनी मंगळवेढा ते रायगड सायकल प्रवास करून याचा प्रचार व प्रसार केला त्यानिमित्त त्यांचे आज संविधान दिना रोजी अविनाश भैया शिकतोडे यांनी संविधान दिनाच्या औचित्य साधून सर्व दुर्गराज गडप्रेमींचे ची संविधान दिनाची उद्देशिका, पुष्पगुच्छ  व बाबासाहेबांचा  संविधान अर्पण करतानाचा संविधान सभेत ला  फोटो भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

                   तसेच यानिमित्त वंचित शहराध्यक्ष अजय गाडे यांनी बोलताना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व २६/११ रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून, सर्व जाती, धर्मातील सर्व घटकांनी  येऊन आपले भारतीय संविधान अबाधित राहिले पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. पाहिजे पुढे बोलताना ते असे म्हणाले की बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठी जास्त त्रास झाला नाही कारण  छत्रपती शिवाजी महाराज यांनी घडवलेले  स्वराज्य डोळ्यासमोर होते. व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



test banner