मंगळवेढा:माजी सैनिक संघटना व वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने २६/११ च्या मुंबई हल्यामध्ये व देशाच्या सिमेवरती लढत असताना स्वतःचे जीवन देशासाठी समर्पित करणाऱ्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
रविवारी नर्मदा पार्क येथील माजी सैनिकांच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता शहिदांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते व देशसेवेसाठी आयुष्य वेचणाऱ्या सेवानिवृत्त माजी सैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वीर जवान तुझे सलाम या देशभक्तीपर कार्यक्रमातून यावेळी पोलीस निरीक्षक रणजीत माने,ॲड रमेश जोशी,अजित जगताप,अजित शिंदे यांनी २६/११/२००८ रोजी मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्यामध्ये मातृभूमीचे रक्षण करताना शहीद झालेले शहीद हेमंत करकरे,शहीद विजय साळसकर,शहीद अशोक कामटे,शहीद संदिप उन्नीकृष्णन,शहीद तुकाराम ओंबळे अशा अनेक वीर जवानांना आदराजंली वाहून शहिदांचे शौर्य,पराक्रम,देशप्रेमाच्या आठवणी जाग्या करून सैनिकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली अमर रहे अमर रहे वीर जवान अमर रहे,भारत माता की जय,वंदे मातरम अशा घोषणा देऊन शहिदांचे स्मरण करण्यात आले.
यावेळी चंगेजखान इनामदार,ज्ञानोबा रायबाग,भारत शिंदे,मुबारक मुलाणी,कृष्णा पडवळे,आबाजी जाधव,बाबुराव माने,प्रकाश निगाडे,के के लिगाडे,अण्णाप्पा धसाडे,सूर्यकांत सुडके,बाबासाहेब माने,अबूबकर तांबोळी,पुंडलिक गणपाटील,महादेव गांडुळे,औदुंबर माने,सुरेश नरळे,धोंडीराम होनमाने,राणू भोसले,सय्यद इनादार,शिवानंद पाटील,धनाजी शिंदे,बसू आडके,दयानंद गायकवाड,शंभूदेव कदम,भारत गवळी,भीमसेन माळी,रामचंद्र दत्तू,दत्तात्रय भोसले,विठ्ठल बिले,विष्णुपंत भोसले,पांडुरंग कोंडुभैरी,सिद्धेश्वर डोंगरे,सतीश दत्तू उपस्थित होते सदर देशभक्तीपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विनायक कलुबर्मे यांनी केले तर मेजर मल्लय्या स्वामी यांनी आभार मानले.