मंगळवेढा:मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार समाधान दादा आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांनी दिली.
त्यामध्ये उद्या दि.२१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळे मध्ये आमदार समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालया मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
तर उद्याच्याच दिवशी जनावरांची मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तर आमदार समाधान आवताडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात व अवताडे शुगर नंदुर या ठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नाव नोंदणीस सुरुवात करण्यात येणार आहे.
दि.२५ नोहेंबर रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत मोफत नेत्रतापासानीचे आयोजन केले आहे.त्यामधे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व गरजूंना चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
दि.२१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मोफत योग विज्ञान शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती मंगळवेढा यांच्या वतीने जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथे करण्यात आले आहे.
त्यांनतर १० डिसेंबर रोजी मोफत जयपूर फूट नोंदणी व मोजमाप,कृत्रिम अवयव,हात व पाय आदीचे आयोजन तनपुरे महाराज मठ,पंढरपूर या ठिकाणी करण्यात आले आहे.
अश्या प्रकारे सर्व कार्यक्रमाचे व सामाजिक उपक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर यांनी दिली.