शिक्षक हा प्रतिसृष्टीचा निर्माता असतो - प्रा डॉ राजेंद्र दास(श्री संत दामाजी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा ) - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०२३

शिक्षक हा प्रतिसृष्टीचा निर्माता असतो - प्रा डॉ राजेंद्र दास(श्री संत दामाजी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा )




                मंगळवेढा- शिक्षक हाच खरा प्रतिसृष्टीचा निर्माता असतो असे मत जेष्ठ साहित्यीक प्रा डॉ राजेंद्र दास यांनी व्यक्त केले ते श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.


  
         अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन बी पवार होते सुरवातीस भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा डॉ राजेंद्र दास यांच्या हस्ते व सचिव किसनराव गवळी,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा सदाशिव कोकरे,प्रा डॉ नवनाथ जगताप,प्रा डॉ संजय शिवशरण तसेच सोलापूर विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक पुरस्कारप्राप्त प्रा गणेश जोरवर  यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका यांचा सन्मान करून शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

                    यावेळी प्रमुख पाहुणे डॉ राजेंद्र दास म्हणाले,भारतात गुरुची परंपरा फार  प्राचीन असुन देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचे योगदान खूप मोठे आहे जगाचा इतिहास पाहिला तर इतिहास हा शिक्षकांनीच घडविलेला आहे विद्यार्थी घडावा म्हणून सातत्याने काम करणारा एकमेव निगर्वी माणूस म्हणजे शिक्षक असतो शिक्षकाचे काम अपूर्व आहे विद्यार्थ्यांना नव्याने काहीतरी देत राहून त्यातुन सुंदर कलाकृती बनविणारा तो एक शिल्पकार आहे आज मात्र शासनाच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिस पद्धतीमुळे शिक्षकाचा घात होत असुन संस्काराची विद्यापीठे कोलमडत चालली आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली शिक्षणाकडे बघताना उदार दृष्टीने पाहिले पाहिजे शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागले तरच त्यांचे अध्यापनात पूर्ण लक्ष लागेल शिक्षक दिनाप्रसंगी राधाकृष्णन यांचे बरोबर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांचेसुद्धा स्मरण होणे आवश्यक आहे माणूस विमानात बसून पक्षासारखा उडायला शिकला,जहाजात बसून माशासारखा पाण्यात विहार करायला शिकला परंतु माणूस म्हणून जगायला शिकला नाही अशा माणसाला माणूस म्हणून बनविण्याचे कार्य हे फक्त शिक्षकच करू शकतात असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


               अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ पवार म्हणाले,शिक्षण व्यवस्था बळकट झाली तरच समाज घडणार आहे. फक्त एकच दिवस शिक्षकाचा सन्मान केला जातो व बाकीचे दिवस त्यांना अनेक इतर अनेक कामे दिली जातात त्यामुळे शिक्षणाचा मुख्य हेतूच बाजूला जातो शिक्षणाचे अंतिम ध्येय मानवाचे मानवीकरण करणे हेच असुन मूल्याधिष्ठित चांगले संस्कार शिक्षणातून होणे अपेक्षित आहे नवीन बदलत्या शैक्षणिक धोरणातील नवनव्या संकल्पना शिक्षकांनी स्विकारणे अपरिहार्य झाले आहे असे सांगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी सर्व प्राध्यापकांना पाठविलेली शुभेच्छा पत्रे वितरीत करण्यात आली तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.


                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ राजकुमार पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रा विनायक कलुबर्मे यांनी केले कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा धनाजी गवळी यांनी आभार मानले यावेळी महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक- प्राध्यापीका उपस्थित होत्या.


test banner