मंगळवेढा: मराठा आरक्षणा साठी शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी महिला,लहान मुले व आंदोलका वरती लाठी चार्ज केला काही आंदोलक जखमी झाले.
जालन्यातील त्या घटनेचा मोठ्ठ्या प्रमाणात पडसाद मंगळवेढ्यात उमटले. सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करत आंदोलन केले व तसेच उद्या मंगळवेढा बंदची ही हाक देण्यात आली.
अंबड जिल्हा जालना या ठिकाणी मराठा आरक्षण साठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर लाठी चार्ज व गोळीबार करणाऱ्या सरकारचा व पोलिसांचा निषेध करण्यासाठी उद्या रविवार दि.३ सप्टेंबर रोजी मंगळवेढा पूर्ण
दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले.
उद्या रविवारी मंगळवेढा तालुका पूर्ण दिवसभर बंद ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडूभैरी यांनी दिली.
आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर ती लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे अशी मागणी करून सरकारचाही निषेध केला.
जालन्यातील त्या झालेल्या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. व कोणाच्या सांगण्यावरून मराठा आंदोलकांवर लाठी चार्ज करण्यात आला याची सर्वांगीण चौकशी व्हावी अशी देखील मागणी करण्यात आली.
त्यावेळी खरेदी प्रसंगाची चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, पक्षनेते अजित जगताप शिवसेना माजी तालुकाप्रमुख येताळा भगत सर, माजी नगरसेवक राहुल सावंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष शरद हेंबाडे, वारी परिवाराचे संस्थापक सतीश दत्तू, प्रकाश मुळीक, नितीन इंगळे, नारायण गोवे, ॲड. राहुल घुले, स्वप्निल निकम,सुदर्शन ढगे, युवराज घुले, मुरलीधर दत्तू, राजेंद्र चेळेकर,विक्रम भगरे,आनंद मुढे,हर्षद डोरले, संतोष पवार, दयानंद दत्तू, अय्याज शेख आदी उपस्थित होते.