विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक :- विष्णू पाटील. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक :- विष्णू पाटील.



         मंगळवेढा: भारता सारख्या कृषी प्रधान देशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे असे मत कृषीतज्ञ विष्णू पाटील यांनी व्यक्त केले ते संत दामाजी महाविद्यालयात आधुनिक शेती या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन बी पवार होते.


                     यावेळी पाटील म्हणाले की,मी सामान्य कुटुंबातला असून माझे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले जसजसे शिक्षण वाढत गेले तसे माझे स्वप्नही बदलत गेले आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले त्यात मी यशस्वी झालो बारा वर्षांपूर्वी मी दहा एकर शेती विकत घेतली त्यात आंब्याची लागवड केली गेल्या आठ वर्षापासून मी त्या शेतातील शंभर टक्के आंबे ५२ देशांमध्ये विक्रीसाठी पाठवले आहेत हे सर्वकाही एका दिवसात घडलेले नाही त्यासाठी कष्ट करण्याची तयारी,कामातील नियोजन व आत्मविश्वास त्याचबरोबर इस्त्राईलच्या शेतीप्रमाणे केलेले आधुनिकीकरण व नियोजन यामुळेच हे शक्य झाले आहे.


                बरेच जण शेतीचा पोत न पाहता, पाण्याचा दर्जा व उपलब्धता न पाहता,दुसऱ्याची शेती पाहून शेती करण्याचा प्रयत्न करतात आणि नुकसान करून घेतात शेतकऱ्यांनी नेहमी आपल्या शेतात विविध पिकांची योजना करावी जेणेकरून एखाद्या पिकात नुकसान आले तर दुसऱ्या पिकात ते भरून निघते अडचणीत खचून न जाता त्यातून नवीन मार्गांचा शोध सातत्याने घेऊन काम करावे आजच्या जगात पिकेल ते विकेल असे न करता विकेल ते पिकवण्याचा प्रयत्न करून यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

             महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर शेती उद्योग,व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करून जीवनात यशस्वी व्हावे असा सल्लाही त्यांनी याप्रसंगी दिला याप्रसंगी महाविद्यालयातील प्रतिवर्षी मुलां-मुलींमधील उत्कृष्ट खेळाडूस म्हणून प्रत्येकी १००१ रूपयाचे बक्षीस जाहीर केले.


                      अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ पवार म्हणाले येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता शेती क्षेत्रातील नवनवे बदल स्वीकारून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करावे व आपल्या देशातील शेती विकासाला चालना व गती द्यावी तसेच मुलांनी रोजगार मागणाऱ्यापेक्षा रोजगार देणारे व्हावे असे सांगून शेतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत रहा असे सांगितले.

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा डॉ नवनाथ जगताप यांनी केले तर आभार प्रा डॉ राजेश गावकरे यांनी मानले यावेळी उपप्राचार्य सदाशिव कोकरे, प्रा राजेंद्र गायकवाड, प्रा डॉ औदुंबर जाधव, प्रा डॉ परमेश्वर होनराव,प्रा डॉ राजकुमार पवार,प्रा शैलेंद्र मंगळवेढेकर तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.


test banner