सावधान! जनावरांमध्ये वाढतोय हा आजार, जनावर बाजार व जनावरांची एकत्रित वाहतूक करण्यास बंदी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

सावधान! जनावरांमध्ये वाढतोय हा आजार, जनावर बाजार व जनावरांची एकत्रित वाहतूक करण्यास बंदी.



       सोलापूर: राज्यात जनावरांमध्ये लंपी आजाराने पुन्हा एकदा थैमान घातले आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनावर बाजार, जनावरांची एकत्रित वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याची महिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.


         लंपी अजारच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात पशुसर्वधन विभागाची बैठक मंगळवारी घेण्यात आली. बैठकी नंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी माहिती दिली.

        सोलापुरातील जिल्ह्यातील सांगोला,माळशिरस,मंगळवेढा,पंढरपूर या भागात मोठ्या प्रमाणात लंपी आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.


     लंपी अजाराच सोलापूर जिल्ह्यात मृत्यू दर जास्त असल्याने खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व जनावरे बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच प्रमाणे जनावरांची एकत्रित वाहतूक करण्यास ही बंदी घालण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले.

     आपल्या जनावरंच्या आसनाऱ्या गोठा स्वच्छ ठेवावा व आपल्या  जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी बैठकीस पशुसंवर्धन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपायुक्त डॉक्टर समीर बोरकर,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे यांच्यासह अकरा तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी उपस्थित होते


.

test banner