मंगळवेढा: राष्ट्रवादी फुटी नंतर शरद पवार यांचा पहिल्यांदाच सोलापूर दौरा असणार. सांगोल्या कडे जाताना संतभुमी मंगळवेढा नगरीत त्यांचे जंगी स्वागत होणार असल्याचे विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांना मानणार मंगळवेढा हा मतदार संघ म्हणून ओळखला जातो.
चेअरमन अभिजीत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना शिवप्रेमी चौक याठिकाणी स्वागतासाठी जमण्यास सांगितले आहे.
शरद पवार साहेब यांचा उद्या मंगळवेढा येथे माचाणुर येथून रॅली निघनार आहे.तेथून ते मंगळवेढा शिवप्रेमी चौक येथे त्यांचा आगमन होणार आहे. तसेच शिवप्रेमी चौक येथे सत्काराचे नियोजन केले आहे.