श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.




                 श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी हॉकीचे जादूगार पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


               सुरवातीस प्राचार्य प्रोफेसर डॉ एन बी पवार यांच्या हस्ते सदर स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.सदर स्पर्धेत कला,वाणिज्य व शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तपन शहा वाणिज्य विभाग,द्वितीय क्रमांक प्रथमेश मोरे शास्त्र विभाग व तृतीय क्रमांक रमेश चौखंडे कला विभाग यांनी यश मिळवले आहेत. 

           


 यावेळी उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे,पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,प्रा डॉ परमेश्वर होनराव प्रा डॉ नवनाथ जगताप, प्रा डॉ औदुंबर जाधव, प्रा डॉ दत्तात्रय गायकवाड, प्रा डॉ राजेश गावकरे, प्रा विनायक कलुबर्मे उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा गणेश जोरवर व प्रा विजय दत्तू यांनी परिश्रम घेतले.

test banner