श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास यात्रेचे यशस्वी आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

श्री संत दामाजी महाविद्यालयामध्ये उद्योजकता विकास यात्रेचे यशस्वी आयोजन.      मंगळवेढापुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर व श्री संत दामाजी महाविद्यालयातील इनोव्हेशन अँड इनक्युबॅशन विभागामार्फत दामाजी महाविद्यालयात दिनांक २४ ऑगस्ट रोजी स्वावलंबी भारत अभियानांतर्गत उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव किसनराव गवळी उपस्थित होते.


              महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजकतेची माहिती व्हावी, स्वयंरोजगार विषयक शासकीय योजना कळाव्यात यासाठी उद्योजकता विकास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

            याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करताना सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य चनवीर बंकुर म्हणाले  सध्याच्या काळात नोकरी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे पण तेवढ्या नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीची मानसिकता बदलून उद्योजक होण्याचे स्वप्न मनी बाळगावे,उद्योजकतेतून स्वतःला तर रोजगार मिळतोच त्याचबरोबर अनेक जणांना रोजगार देण्याचे सामर्थ्यही निर्माण होते असे अनेक जण उद्योजक होतील तेंव्हा आपणास महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही ह्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करणे,त्यांना मार्गदर्शन करणे, उद्योजकासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे यांची माहिती देणे त्याचबरोबर आर्थिक पाठबळाची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करावा,तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीचे कौशल्यही शिकवले जाणार आहे असुन सदर यात्रा फक्त महाविद्यालयापर्यंत सिमीत नसून समाजापर्यंत पोहचवली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले .


           उद्योजक शशिकांत चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना उद्योगातील संधी व आव्हाने या संदर्भात अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन करताना केवळ सबसिडी डोळ्यासमोर ठेवून कोणताही व्यवसाय सुरू करू नये असा सल्ला दिला.

               सोलापूर विद्यापीठातील इनक्युबॅशनचे व्यवस्थापक  श्रीनिवास पाटील म्हणाले कोणताही उद्योग सुरुवातीला अडचणीतूनच पुढे जातो त्यासाठी काळानुसार उद्योगात बदल करणे आवश्यक असते, तसेच उद्योगात काही काळ संयम ठेवून काम करावे लागते.


            यावेळी स्वावलंबी भारत अभियानाचे सोलापूर जिल्हा संयोजक ओम  इंगळे,मंगेश वेदपाठक,सुदर्शन यादव यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक,प्राध्यापिका व विद्यार्थी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन विभाग प्रमुख प्रा डॉ राजाराम पवार यांनी केले,सूत्रसंचालन प्रा डॉ राजकुमार पवार यांनी केले तर प्रा प्रशांत धनवे यांनी आभार मानले.


test banner