सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी डोळे येण्याची साथ सुरू आहे. ऑडिनो या विषाणू मुळे डोळे येत असून हा एक संसर्गजन्य रोग आहे. राज्यात डोळे येण्याची सर्वाधिक रुग्णसंख्या पुणे शहर व जिल्ह्यात नोंदवली गेली आहे.तज्ञांच्या मार्गदर्शना नुसार काळजी घेण्याचे सांगितले जात आहे.त्यामधे डोळे आलेल्या रुग्णांनी डोळे थंड पाण्याने धुवावे,तसेच अश्या व्यक्तींनी स्वतंत्र टॉवेल किंव्हा रुमाल वापरावा.
डोळे येण्याची लक्षणे:-
- डोळे लाल होणे.
- वारंवार पाणी येणे.
- डोळ्याला सूज येणे.
- डोळे कचकच करणे.
- किंचित अंधूक दिसणे.
अशी घ्या काळजी.
- वैयक्तीक स्वच्छता ठेवणे.
- सारखे सारखे हात धुणे.
- सारखे सारखे डोळ्याला हात लावू नये.
- उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्मा वापरावा.
- इतर व्यक्तींचा रुमाल,टॉवेल,कपडे इ.डोळे पुसू नये.
- त्वरित डॉक्टरांकडून तपासून यावे.