श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाने इंग्लिश स्कूल येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून मंगळवेढा तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
फ्री स्टाईल कुस्ती प्रकारातील ५७ किलो वजन गटात शुभम डांगे याने प्रथम क्रमांक,शुभम केंगार द्वितीय क्रमांक तर अजय जाधवने तृतीय क्रमांक पटकाविला तसेच ६१ किलो वजन गटात जीवन बेंद्रे प्रथम तर दत्तात्रय देवकते याने तृतीय क्रमांक मिळविला,६५ किलो वजन गटात राजवीर शिंदे प्रथम,७० किलो वजन गटात पृथ्वीराज गवळी प्रथम,७४ किलो वजन गटात शिवप्रसाद मुळे द्वितीय,७९ किलो वजन गटात सोहम बंडगर प्रथम,६० किलो ग्रीको कुस्ती प्रकारामध्ये पृथ्वीराज कोंडुभैरी याने प्रथम क्रमांक मिळवुन सर्व खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केलेले आहे.
यावेळी प्राचार्य डॉ एन बी पवार म्हणाले सर्व
गुणी खेळाडुंच्या उज्ज्वल यशाने महाविद्यालयाचा नावलौकीक वाढत आहे असे सांगून सर्व विजेत्यांचा डॉ पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पर्यवेक्षक प्रा राजेंद्र गायकवाड,प्रा गोविंद गायगोपाळ,प्रा विनायक कलुबर्मे,प्रा श्रीराम पवार, प्रा विजय दत्तू उपस्थित होते सर्व विजेत्या खेळाडूंचे राहुल शहा, बाबासाहेब पाटील,किसनराव गवळी, ॲड रमेश जोशी, डॉ मोहन कुलकर्णी, यादव आवळेकर, डॉ अशोक सुरवसे,प्राचार्य डॉ एन बी पवार,उपप्राचार्य प्रा सदाशिव कोकरे यांचेसह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले सर्व खेळाडूंना प्रा विजय दत्तू व प्रा गणेश जोरवर यांचे मार्गदर्शन लाभले.