मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉक साठी गेले असता एका सायकल स्वाराचे अपघाती निधन,गावावरती पसरली शोककळा - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

संवाद न्यूज चॅनेल लवकरच

सोमवार, ३१ जुलै, २०२३

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉक साठी गेले असता एका सायकल स्वाराचे अपघाती निधन,गावावरती पसरली शोककळा      मंगळवेढा : आज सकाळी साधारणतः 6.45 सुमारास चंद्रकांत सोनगे हे नियमित प्रमाने मॉर्निंग वॉकसाठी सायकल वरती जाऊन माघारी येत असताना पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिलीअसता त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

           मूळचे ते सिद्धापुरचे असून मंगळवेढा इथे ते स्थायिक झाले होते. मॉर्निंग वॉक गेले असता त्यांच्या सायकलीला अज्ञान वाहनाने धडक दिल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला.मंगळवेढा पासून सोलापूर रस्त्यावरील थोड्या अंतरावर अशी धक्कादायक घटना घडली आहे.

         चंद्रकांत सोनगे हे मृत्यू झालेल्या सायकल स्वाराचे नाव आहे. सिद्धापुरचे माजी सरपंच संतोष सोनगे यांचे ते बंधू होते.चंद्रकांत सोणगे यांच्या मृत्यू मुळे सिद्धापुर गावावरती शोककळा पसरली आहे.