ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दामाजी कारखान्याच्या गळीतासाठी आपला ऊस देवुन सहकार्य करावे-चेअरमन शिवानंद पाटील - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दामाजी कारखान्याच्या गळीतासाठी आपला ऊस देवुन सहकार्य करावे-चेअरमन शिवानंद पाटील

 




मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन २०२२-२३ गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पुजन रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहूल शहा,जिजामाता पतसंस्थेचे रामकृष्ण नागणे,चेअरमन शिवानंद पाटील,व्हा-चेअरमन तानाजी खरात यांच्या शुभहस्ते शनिवार दि।२९/१०/२०२२ रोजी करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी दिली

कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दि।१७/१०/२०२२ रोजी सुरू झाला परंतु हंगामाचे सुरुवातीला मोठया प्रमाणात पाऊस झालेने प्रत्यक्ष गाळपास दि।२७/१०/२०२२ रोजी सुरुवात केलेली असुन चालु हंगामाकरिता कार्यक्षेत्रामध्ये ८ ते ९ लाख मे।टन ऊस उपलब्ध आहे। कमी कालावधीत अनेक अडचणीवर मात करत गळीत हंगाम सुरु केला आहे। आपला कारखानाही जिल्हयातील इतर कारखान्याच्या बरोबरीने वेळेत सुरु झालेला आहे। या हंगामात सहा लाख मे।टन गाळपाचे उदिष्ठ संचालक मंडळाने  ठेवलेले आहे.                       सर्व सभासद-शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, कामगार यांच्या सहकार्याने हे उदिष्ठ आपण निश्चीतच गाठणार आहोत याकरिता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी- सभासद यांनी आपला ऊस दामाजी साखर कारखान्याचे गळीतास पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी साखर पोते पुजन प्रसंगी केले।

साखर पोती पुजन प्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री प्रकाश पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणू पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, तसेच चंद्रशेखर कोंडूभैरी, पिंटू शिंदे, धनाजी बिचुकले, सुरेश पाटील, प्रमोद पुजारी, शुभम पुजारी, सिध्दे्श्वर डोके, राजू रणे, गेना दोलतडे, तसेच कारखान्याचे चिप‹Š इंजिनिअर धैर्यशील जाधव, चिफ केमिस्ट रमेश जायभाय, चिफ अकौंटंट रमेश गणेशकर, मुख्य शेती अधिकारी कृष्णात ठवरे, कार्यालयीन अधिक्षक दगडू फटे, सिव्हील इंजिनिअर प्रविण मोरे, परचेस आॕफिसर येताळा सावंजी, स्टोअरकिपर उत्तम भुसे, गोडावूनकिपर विश्वास पवार, हेड टाईम किपर आप्पासोा शिनगारे, केनयार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, सुरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे कामगार संघटनेचे अध्यक्ष विठठल गायकवाड, कामगार पतसंस्थेचे चेअरमन विश्वास सावंजी तसेच विभाग प्रमुख,परिसरातील सभासद-शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कर्मचारी उपस्थित होते।

test banner