मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ सोडत संपन्न! समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा चे प्रथम मानकरी ठरले ज्ञानेश्वर ऐवळे! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

मंगळवेढा येथे समृद्धी ट्रॅक्टरचा लकी ड्रॉ सोडत संपन्न! समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा चे प्रथम मानकरी ठरले ज्ञानेश्वर ऐवळे!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा येथे लकी ड्रॉ घेण्यात आला या लकी ड्रॉ मध्ये मंगळवेढा तालुक्यातील ग्राहकांना बोलविण्यात आले होते प्रत्येकी दहा ट्रॅक्टरवर लकी ड्रॉ घेण्यात आला. यामध्ये पहिले बक्षीस मोटार सायकल,दुसरे बक्षीस वाटर सोलर, तिसरे बक्षीस आटा चक्की आणि राहिलेल्या सात ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या लकी ड्रॉ मध्ये ज्ञानेश्वर मलकारी ऐवळे,रा- चिकलगी, ता-मंगळवेढा यांना पहिले बक्षीस मोटरसायकल मिळाले,  शिवाजी गिरजाप्पा पुजारी, रा- रेवेवाडी, ता-मंगळवेढा यांना दुसरे बक्षीस वॉटर सोलर मिळाले, किरण बाबासाहेब पवार रा- सलगर ता- मंगळवेढा यांना आटा चक्की तिसरे बक्षीस मिळाले. राहिलेल्या सात ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.


प्रत्येकी दहा ट्रॅक्टर वरती लकी ड्रॉ ही स्कीम 30 सप्टेंबर 2022 पर्यंत समृद्धी ट्रॅक्टर्स कडून वाढवण्यात आली, त्याचबरोबर सोनालीका कंपनीकडून नवीन आकर्षक स्कीम देण्यात आली यामध्ये पहिले बक्षीस सोनालिका   पहिले बक्षीस 52 एचपी चे तीन ट्रॅक्टर, दुसरे बक्षीस 11 रोटावेटर , तिसरे बक्षीस 25 मोटरसायकल, चौथे बक्षीस 40 एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस 45 फ्रिज, सहावे बक्षीस 50 वॉशिंग मशीन, सातवे बक्षीस 101 स्मार्टफोन, आठवे बक्षीस 150 मिक्सर आणि  नववे बक्षीस 400 डिनर सेट ही स्कीम सोनालिका कंपनीकडून 20 सप्टेंबर 2022 ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंत देण्यात आली आहे, यादरम्यान ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरेदी करण्यासाठी लाभ होईल या स्कीमचा  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आव्हान करण्यात आले.



या कार्यक्रमासाठी सर्व शेतकरी बांधव सोनालिका ग्राहक  सोनालिका कंपनीकडून  ओम प्रसाद दुधाटे सर, आय सी आय सी बँकेचे सुरज माळी सर, कागष्ट गावचे सरपंच संजय विठ्ठल काकेकर, सोमनाथ केसकर, श्याम सुंदर,चव्हाण फिरोज शेख आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.

test banner