श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या नुतन कार्यकारी संचालकपदी सुनिल दळवी यांची नियुक्ती - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

शुक्रवार, २९ जुलै, २०२२

श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या नुतन कार्यकारी संचालकपदी सुनिल दळवी यांची नियुक्ती

 


मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पदावर सुनिल रामलिंग दळवी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.                                      सुनिल रामलिंग दळवी यांचे शिक्षण बी एस्सी।एलएलबी, डी।बी।एम झाले असून त्यांना साखर कारखानदारीतील प्रदिर्घ अनुभव आहे.त्यांनी आतापर्यंत सहकारमहर्षि शंकरराव मोहिते पाटील अकलूज,लोकनेते बाळासाहेब देसाई स..सा.का लि। पाटण, सहकार शिरोमणी वसंतराव काळे स.साका लि,चंद्रभागानगर पंढरपूर, मकाई स.सा.का लि करमाळा, छत्रपती स.सा.का लि।, इंदापूर, लोकमंगल शुगर इथेनाॕल अँड को-जन इंडस्ट्रीज भंडारकवठे येथे चिफ केमिस्ट म्हणून तर शरयु अॕग्रो इंडस्ट्रीज फलटण व तात्यासाहेब कोरे वारणा स.सा.का लि,वारणानगर येथे प्रोडक्शन मॕनेजर तर कर्मवीर काकासाहेाब वाघ स.सा.का लि,नाशिक येथे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या याप्रदिर्घ अनुभवाचा फायदा संत दामाजी साखर कारखान्यास निश्चीतच होणार असल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगितले।

  सुनिल दळवी यांच्या नियुक्तीनंतर चेअरमन शिवानंद पाटील,व्हाचेअरमन तानाजी खरात व संचालक मंडळाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.                                      सदर प्रसंगी संचालक राजेंद्र पाटील,भारत बेदरे,दयानंद सोनगे,औदुंबर वाडदेकर,रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील,पी.बी पाटील,दिगंबर भाकरे,महादेव लुगडे,अशोक केदार,तानाजी कांबळे,निर्मला काकडे,तसेच माजी प्र।कार्यकारी संचालक रमेश गणेशकर,खाते प्रमुख, विभाग प्रमुख उपस्थित होते।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा