अजित पवार भालके कुटुंबीयांना भावनिक करत विठ्ठल कारखाना ढापायच्या बेतात-गोपीचंद पडळकर - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १० एप्रिल, २०२१

अजित पवार भालके कुटुंबीयांना भावनिक करत विठ्ठल कारखाना ढापायच्या बेतात-गोपीचंद पडळकर

 


पंढरपूर (प्रतिनिधी) अजित पवार यांनी मंगळवेढ्यातील ३५ गावांना पाणी का दिले नाही. एफआरपी जाहीर झाली मात्र, ऊसाचे पैसे दिले नाहीत. कामगारांची देणी थकवली. भालके कुटुंबीयांना भावनिक करत विठ्ठल कारखाना ढापायच्या बेतात पवार आहेत. अजित पवारांच्या तोंडी टगेगिरीची भाषा शोभत नाही असे म्हणत पवार यांची भाषा टगेगिरीची मात्र रडणे बाईसारखे असल्याची टिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी आले असता आ. गोपीचंद पडळकर माध्यमांशी बोलत होते.                                                                 पुढे बोलताना पडळकर म्हणाले की, अजित पवार हे माझ्यावर डिपॉझिट जप्त झाल्याची टीका करत आहेत.मात्र, मावळमधून पार्थ पवार यांना अडीच लाख लोकांनी का? नाकारले याचे उत्तर अजित पवार यांनी द्यावे. तसेच माढा लोकसभामधून खा. शरद पवार का पळाले? याचेही उत्तर अजित पवार यांनी द्यावे. ज्या लोकांनाकडे मते मागत आहेत. त्या ३५ गावच्या लोकांना अद्याप पाणी का दिले नाही. याचे उत्तर द्यावे, असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.तसेच अजित पवार यांना आदिनाथ कारखान्यासारखा पंढरपूरचा विठ्ठल कारखाना ढापायचा आहे. या करीता चुलते-पुतणे मिळून प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी भालके कुटुंबियांना भावनिक केले जात आहे. भालके कुटुंबियांना भावनिक करुन पवार कुटुंबियांनी कारखान्यांची तयार केलेल्या मोठ्या चेनमध्ये विठ्ठल कारखाना समाविष्ठ करायचा बेत असल्याचे सांगत अजित पवार यांना टगेगिरीचा भाषा शोभत नाही. अजित पवार यांचे बोलणे टग्यासारखे आहे. अन रडणे बाई सारखे आहे. जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा अजित पवार ढसाढसा रडल्याचे माध्यमांसमोर पाहिले असल्याचे आ.पडळकर यांनी सांगीतले.तसेच मंगळवेढ्यातील ३५ गावांना पाणी दिले असते. ऊसाचे पैसे थकविले नसते. तर अजित पवार यानां पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या घराघरात जावून कांदा पोहे खाण्याची वेळच आली नसती. राज्याचा उपमुख्यमंत्री कधी गल्ली बोळात जावून प्रचार करतो का? असा सवालही उपस्थित केला.

test banner