मंगळवेढा(प्रतिनिधी ) गोरगरिबांचा वाली असलेल्या कै भारत नाना भालके यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी व त्यांच्याअपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी भगीरथ भालके यांना निवडून देण्याचे आवाहन प्रसिद्ध गायक गायक आनंद शिंदे यांनी मंगळवेढा येथे केले
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत निमित्त महा विकास आघाडीचे उमेदवारर भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारा निमित्त महमदाबाद गुंजेगाव, मारापुर, मल्लेवाडी ढवळस, देगाव, आदि गावात प्रचार सभा पार पडल्या यावेळी मंगळवेढ्याचे भूमिपुत्र प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यावेळी प्रचार सभेत बोलत होते. यावेळी बोलताना आनंद शिंदे शरद पवार हे सर्वसामान्यांची जाण असणारे नेते असून माझ्यासारख्या सर्वसामान्य गायकाला आमदार म्हणून विधानपरिषदेवर शिफारस केली आहे त्याच प्रमाणे माझ्या भूमीतील व विधानसभेचे आ स्वर्गीय भारत नाना भालके यांचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध होते. मंत्रालयात कामानिमित्त सातत्याने येत असत् त्यांची कामाची चिकाटी जिद्द वाखाणण्याजोगी होती मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे सामान्य लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हीच त्यांची भूमिका होती
खरंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी पाहिजे होती. आमदार भारत भालके या जनतेचे नाते अतूट होते सर्वसामान्य माणूस मंत्रालयात जाऊन भारत नाना सोबत काम करू शकतो हो मी उघड्या डोळ्यांनी मंत्रालयात पाहिले आहे. अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी व नानाच्या उपकाराची परतफेड करून भगीरथ भालके यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन गायक आनंद शिंदे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी भाजपाच्या ठेकेदार उमेदवाराकडून जनतेची कशी फसवणूक केली जाते याबाबत सांगून कै आ भारत नाना यांनी 35 गाव भोसे प्रादेशिक योजना उजनी कालवा व माण नदीला पाणी पाणी सोडण्याबाबत वारंवार घेतलेली ठाम भूमिका वीज , आरोग्य रस्ते यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे झालेली विकासकामे सांगून सरकार आपल्या विचारांचे असल्याने निधी कमी पडणार नसल्याचे सांगत निवडून देण्याचे आवाहन केले
रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा म्हणाले की देशाचे कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब यांचे आणि आमच्या आजोबा कै रतनचंद शहा यांचे संबंध होते सहकारी संस्था वाढवण्याचे काम पवार साहेबांनी केले त्याप्रमाणे सहकारी संस्था अडचणी असलेल्या त्यांनाही मदत करण्याचे काम केले आपल्या पंढरपूर मंगळवेढ्याच्याविकास कामासाठी पस्तीस गावच्या पाणीप्रश्नासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला आपण विकास कामासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनानिवडून द्यावे असे आवाहन राहुल शहा यांनी केले.
पी. बी पाटील म्हणाले की स्व भारत नाना भालके हे गरिबांचे दैवत होते. त्यांना सर्वसामान्य गरिबाच्या डोळ्यातील अश्रू ची जाण होती त्याने आपल्या आमदारकीच्या काळात गावगाड्यातील कोणत्याही राजकीय तरुणाला दोषाने.कधीही पाहिले नाही. सूडबुद्धीचे राजकारण कधी केले नसल्याचे सांगितले
यावेळी मारापुर येथील दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक भुजंगराव आजबे,माजी संचालक शहाजी यादव, माजी उपसरपंच संजय आसबे, माजी सरपंच रमेश आसबे , माजी गटविकास अधिकारी योगेश आसबे, तावशीचे माजी सरपंच रवींद्र कांबळे यांनी महा विकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आनंद शिंदे यांचे उपस्थिती मध्येराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमास माजी चेअरमन नंदकुमार पवार नगरसेवक अजित जगताप तानाजी खरात मारुती वाकडे अशोक पाटील मारुती मासाळ, चंद्रशेखर कोंडूभैरी, रामेश्वर मासाळ, अरुण किल्लेदार भारत बेदरे, पैलवान कोळेकर भास्कर मोरे सुनील यादव बाबासाहेब जाधव सरपंच संगीता रणदिवे आदी पदाधिकारी उपस्थित होते