मंगळवेढा तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सोडविण्याची तळमळ फक्त शैलाताई गोडसे यांचेमध्येच आहे - प्रभाकर भैय्या देशमुख - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

मंगळवेढा तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न सोडविण्याची तळमळ फक्त शैलाताई गोडसे यांचेमध्येच आहे - प्रभाकर भैय्या देशमुख

  जनहित शेतकरी संघटनेचा शैलाताई गोडसे यांना पाठिंबा 


मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लक्षवेधक असणारा मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्याची तळमळ आणि धमक फक्त शैलाताई गोडसे यांचेकडेच असल्याचे मत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी व्यक्त केले आहे. जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर देशमुख बोलत होते.

प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, आज पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभांमध्ये प्रत्येक पक्षाचे उमेदवार आणि नेते मंगळवेढ्याच्या पाणीप्रश्नावर बोलत आहेत. पण आज हे बोलणारे उमेदवार आणी नेते मी ज्यावेळी या पस्तीस गावच्या पाणीप्रश्‍नासाठी विधानभवनासमोर तब्बल शंभर दिवस आंदोलन केले. त्यावेळी एकानेही मला सहकार्य केले नाही किंवा साधा विचारपूसही केली नाही. पण या पोटनिवडणुकीत उभे राहिलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये फक्त शैलाताई गोडसे यांनीच मंगळवेढा तालुक्याच्या पाणीप्रश्‍नासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी केलेले आंदोलन असो अथवा म्हैसाळ योजनेचे पाणी शिरनांदगी तलावात पोहोचण्यासाठी तलावातच केलेले आंदोलन असो या सर्व आंदोलनांमधून शैला गोडसे यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ अत्यंत जवळून आम्ही पाहिली आहे. याशिवाय पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या इतर प्रश्नांविषयीची सुद्धा शैला गोडसे यांची फार मोठी तळमळ आजपर्यंत बघायला मिळाली आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या वतीने आज शैला गोडसे यांना पाठिंबा दर्शविला आहे. या पुढील काळात शैला गोडसे यांच्या विजयासाठी जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील.

test banner