मंगळवेढा(प्रतिनिधी) कोरोनाच्या काळात शेतकरी महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने का मदत केली नाही. शेतकऱ्यांच्या जिवालाच्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाहीत, एकदा मतदान झाले की लॉकडाउन लागू करणार शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार , दुधाचे,डाळींबाचे ,द्राक्षाचे या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही.मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक केला.
ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील आठवडा बाजार येथे आयोजित सभेत बोलत होते.
व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, श्रीमंत कोकाटे, उमेदवार सचिन शिंदे, दत्तात्रय गणपाटील,अँड.राहुल घुले, दामाजी कारखान्याचे माजी संचालक श्रीधर खांडेकर,श्रीमंत केदार, संदीप कारंडे,बीड पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे,विठ्ठल कारखान्याचे संचालक बागल,राजाराम सावंत,दयानंद पाटील, संजय बेडे,हर्षद डोरले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, दिगवंत भारत भालके यांना उमेदवारी देण्यासाठी राजाराम सावंत त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते मी उमेदवारी दिली ते विजयी झाले पण निवडून आलेल्या तिसऱ्याच दिवशी ते दुसऱ्या पक्षात गेले. आजपर्यंत विकास केला म्हणणारे एकानेही विकास केला नाही.35 गावाला पाणी आणणार म्हणून अजून आणले नाही ते पुन्हा म्हणतात आता नक्की आणणार अरे जनतेची किती दिशाभूल करचाल, पाणी मागून मिळणार नाही ते हिसकावून घेण्याची धमक असणाऱ्याच पाणी मिळणार आहे. त्यासाठी सचिन पाटील निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले.शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत म्हणून विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती आणली तरीदेखील जिल्हाधिकारी जप्ती करत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावापोटी ही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.नियमित कर्ज फेडणाऱ्याना सूट देणार होते,सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही आता कुठे केले .. काय झाले. या राज्यातील गरीब जनतेसाठी या सरकारने काय केले, ऊस तोडणी मजुरांसाठी काय केले,हमाली करणाऱ्या नागरिकांसाठी काय केले या सरकारने यांचा विचारच केला नाही.इथले नागरिक बेरोजगार युवक कामासाठी बाहेर गावी जात आहेत यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुम्ही काय केले , शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा, केळी बागा उध्वस्त झाल्या सरकार मधील मंत्री कुठे गेले फक्त प्रचार करून जात आहेत.पैसे नाहीत म्हणणारे सरकार स्वतःच्या मंत्र्यांसाठी किती खर्च गाड्या घेतल्या घरे बदलली शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणता एक चोर साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. न्याय भीक मागून मिळत नाही, मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा लागतो. क्रांती घडवण्यासाठी सचिन पाटील यांच्यात धमक असल्याचे त्यांनी सांगितले
उमेदवार सचिन शिंदे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मध्ये नव्या परिवर्तनाची लाट आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केलेल्या होत्या त्यातील एकही घोषणा यांनी पूर्ण केली नाही.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, पीक कर्ज देणार होते, पीक शेतात असताना लाईट कट करण्याचे पाप यांनी केले आहे. गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लॉक डाउन काळात शेतकऱ्यांना, महिलांना एका रुपयाची ही मदत केली नाही.विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांचे बिल दिले नाही जनता त्यांना पाडल्या शिवाय राहणार नाही. कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत, ऊसाची देणी त्या मगच मत मागाला या अशी भूमिका घेतली.आमदार पुत्र हे वारसा हक्क सांगून आमदारकी मागत आहेत.त्यांनी शेतकरी व गरीब लोकांसाठी काय काम केले शेतकऱ्यांना लुटण्याचे काम यांनी केले आहे. 19 हजार शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला आहे.त्यामुळे त्यांचे सभासदत्व कायम राहणार आहे.35 गावचे पाणी म्हणजे निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला झाला आहे. आजपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने तेथील जनतेला फसवले आहे. ज्या बारामती करांनी तुमचे पाणी चोरले आहे तेच आज इथे येऊन पाणी देतो म्हणतात ते पाणी काय देणार नाहीत म्हणून नागरिकांनी त्यांना घरी बसवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
रविकांत तुपकर बोलताना म्हणाले की, अन्याय करणाऱ्यांचे मुस्काट फोडा अशी शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांना राजू शेट्टी यांनी पाहिली उमेदवारी दिली होती. माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक आहे.त्यामुळे जनतेने योग्य उमेदवार कोण आहे ते ओळखून मत द्यावे.
प्रेमापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराला आले आहेत अशा भ्रमात राहू नका,ते विठ्ठल साखर कारखाना हडप करण्यासाठी आले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत त्यानी आंदोलने केली म्हणून त्यांना तुरंगात टाकले. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर हा राजू शेट्टी यांच्यामुळे दिला जात आहे.
पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत.ही जनता त्यांना योग्य जागा दाखवून देईल , हवा वरून कुणाची ही दिसत असेल पण खरी हवा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांची 46 कोटी एफ आर पी आणली पण बिल अदा न करता स्वतःसाठी ठेवले निवडणूक लढवत आहेत.
2009 साली दिगंवत आमदार भारत भालके यांनी सांगितले होते, राजा का बेटा राजा नाही होता, जो काबिल है वही हाकदार बनेगा मग आता ही घराणेशाही कशासाठी असा सवाल त्यांनी केला.