जनतेला द्यायला पॅकेज नाही. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये तिजोरीचे चाव्याचे अमिष दाखवत अजित पवार दारोदारी फिरत आहेत- केशव उपाध्ये - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ११ एप्रिल, २०२१

जनतेला द्यायला पॅकेज नाही. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये तिजोरीचे चाव्याचे अमिष दाखवत अजित पवार दारोदारी फिरत आहेत- केशव उपाध्ये

 


पंढरपुर: पंढरपुरात लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहे. महाविकास आघाडी,भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्यत्वे लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे काँगेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपूर-मंळवेढ्याचा दौरा आटोपता घेतला आहे. दोन दिवसात अजित दादा पवार यांनी विरोधी पक्षांना बरेच धक्के दिले आहेत. आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या नेत्यांची फौज पंढरपुरात पाठवली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे आता पंढरपुरात दाखल झाले आहेत.                                                                        पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत घेतली आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत त्यामुळे भगीरथ भालके यांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्याला उत्तर देताना भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की , कोरोनामुळे राज्याच्या जनतेला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत. जनतेला द्यायला त्यांच्याकडे कोणतेही पॅकेज नाही. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये तिजोरीचे चाव्याचे आमिष दाखवत असल्याचा आरोप केला.

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माढा खासदार रणजितसिंह निंबाळकर नाईक यांच्यासह जिल्ह्यातील भाजप नेते उपस्थित होते. संजय राऊत हे कोरोनाबाबत राजकारण करत आहेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधकांना सांगतात की कोरोना विषाणूचा मुद्द्यांवरून राजकारण करू नका. मात्र, खासदार संजय राऊत यांनी 'सामना'च्या माध्यमातून आपली मुखपट्टी काढून राजकारण सुरू केले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. राज्य सरकारचा निधी फक्त बारामतीसाठी दिवंगत आमदार भारत भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांसाठी भरपूर प्रयत्न केले आहेत. मात्र, 35 गावाच्या पाणीप्रश्नसाठी महाविकास आघाडी एक रुपयाचा निधी दिला नाही.

test banner