राष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित! - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २० मार्च, २०२१

राष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित!

 


मंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.दरम्यान दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

                                                                            भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवडीवरुन राष्ट्रवादीत ठिणगी उडाली. युवराज पाटील यांनी बंडाचा झेंडा उभारत त्यांच्या उमेदवारीला आव्हान दिले. युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बंडाची दखल थेट पक्षाने घेतली असून पक्षातील जेष्ठ नेत्यांची पसंती सुध्दा  जयश्री भालके यांच्या नावालाच असल्याची सूत्रांची माहिती आहे.                                                              तर दुसरीकडे समाधान आवताडे, शैला गोडसे हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. भाजप या मतदारसंघात उमेदवार उतरवणार की नाही याबाबत मात्र अजून कोणतीही भूमिका समोर आलेली नसले तरी स्थानिक पातळीवर परिचारक समर्थक असलेल्या विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या नावाचे शिपारस होवू शकते.आणि त्यांचेच नाव भाजपाकडुन सध्या तरी निश्चित मानले जाते. जर राष्ट्रवादीकडुन डावपेच आखत जर उमेदवार बद्दला गेला तर भाजपाचा सुद्धा उमेदवार बदलू शकते अशी शक्यता वर्तवली जाते. 


दरम्यान, एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील धुसफूस देखील आता समोर येत आहे. शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा व जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.                                                   मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे ही पोटनिवडणुक लढविण्यासाठी डिसेंबर पासून मतदारसंघात आपला पुर्ण वेळ देऊन चाचपणी करत आहेत. सध्या तरी ते अपक्ष लढण्याच्या भुमिकेत आहेत.जर राष्ट्रवादीने जर जयश्री भालके यांना उमेदवारी दिले की ते एक वेळ माघार घेऊ शकतात असे जनतेतून शक्यता वर्तविले जात आहे. भगीरथ भालके यांना उमदेवारी दिले के समाधान आवताडे सुद्धा पुर्ण ताकदीने निवडणूक लढवतील अशी ही चर्चा जनतेतून होत आहे. 


test banner