स्व. आ. भारत भालके यांना खिदमत चॅरिटेबल बहुउदेशीय संस्था,मंगळवेढा कडून श्रद्धांजली. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

स्व. आ. भारत भालके यांना खिदमत चॅरिटेबल बहुउदेशीय संस्था,मंगळवेढा कडून श्रद्धांजली.



मंगळवेढा येथील खिदमत चॅरिटेबल बहुउद्देशीय संस्था, मंगळवेढा कडून स्व.आमदार भारत (नाना)भालकेसाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.


यावेळी खिदमत चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष नजीर इनामदार यांच्या हस्ते स्व.आमदार भारत(नाना) भालकेसाहेब यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलनन करून व पुष्प वाहण्यात आली.


यावेळी नाना ना आदरांजली वाहताना जमीर इनामदार म्हणाले, मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील मागील 11 वर्षात आमदार म्हणून सर्व जाती धर्माचे लोकांच्या सुखदुखात थेट सहभागी होत उपस्थिती लावल्यामुळे जनतेच्या  मनावर एक वेगळी छाप पाडून आमदार भारत (नाना)भालके साहेब हे  सलग तीन वेळा  जनतेचे आमदार ठरले असल्याने त्यांनी सांगितले.


याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नजीर इनामदार,उपाध्यक्ष रशीद तांबोळी,गब्बार आतार,सचिव जमीर इनामदार, कार्याध्यक्ष जावेद दरवाजकर,सलीम हजी बागवान, आरिफ खतीब, विनायक रजपूत,आदम शेख,राजू आतार, बिलाल बागवान, इरफान बागवान, नदीम मुजावर, तौफिक आकुंजी,भय्या बागवान,शब्बीरं शेख, युन्नूस बागवान, इम्रान बागवान,जलाल मुल्ला, अशोक माने, शुभम रोकडे, बबलू बागवान धनाजी खडतरे, योगेश बनसोडे, रईस शेख,युसूफ बागवान आदीजन उपस्थित होते.

test banner