युटोपियन शुगर्स येथे मंगळवेढा तालुका व शहर पोलिस स्टेशन यांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियाना विषयी मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पो.नि. श्री.जोतिराम गुंजवटे व वाहतूक शाखेचे हवालदार बंडू कुंभार यांनी वार गुरुवार दि. 23/01/2020 रोजी कारखाना कार्यस्थळा वर येऊन वाहतुकीच्या नियमांच्या माहिती विषयी जनजागरण करण्यात आले. यामध्ये ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालक व मालक यांना रस्ता सुरक्षितते विषयी मार्गदर्शन करण्यात आले. सध्या अपघातचे प्रमाण वाढत असून त्यामध्ये होणारी जीवित हानी ही चिंताग्रस्त करणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्ष राहून स्वतः बरोबरच इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत श्री.जोतिराम गुंजवटे यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील,यांचे समवेत सर्व खाते-प्रमुख,अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील यांनी केले. यावेळी ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रोंलीला रिफ्लेक्टर व बॅनर लावण्यात आले. व क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करण्यात येऊ नये,साऊंड चा आवाज मर्यादेपेक्षा जास्त ठेऊ नये, तसेच ना-दुरुस्त वाहनांच्या दुरूस्ती करिता वाहन रस्त्यावर उभे करण्यात येऊ नये, रस्त्यावरून वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर पंक्चर झाल्यास वापरण्यात येणारे मोठ-मोठे दगड हे वाहनं दुरुस्त झाल्यावर रस्त्याच्या बाजूला करण्यात यावेत, तसेच रात्रीच्या वेळी लाईटचा पुरेपूर वापर करण्यात यावा अनेक प्रकारच्या बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच वाहनांच्या विमा मुदत योग्य असल्याची खात्री करण्यात यावी असे आवाहन श्री.गुंजवटे यांनी केले..