राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १३ जानेवारी, २०२०

राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्नजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत  “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या चेअरमन सौ. आशाताई  रामकृष्ण नागणे व व्हाईस चेअरमन सौ मीरा सुखदेव दत्तू, संचालिका साखराबाई रामचंद्र जाधव,  सौ.सत्यभामा ज्ञानेश्वर भीमदे, सौ. मंगल रामचंद्र गवळी तसेच सचिव श्री. श्रीकांत जाधव, लहुराज जगताप , मयूर हजारे व अभिजीत शिंदे उपस्थित होते.
यावेळी बोलताना चेअरमन सौ.आशाताई नागणे म्हणल्या “आपल्या भागात अनेक महिलानी सक्षमपणे बचत गट चालवले आहेत. अश्या गटांनी फक्त बचत आणि कर्ज वाटप या पुरते मर्यादित न राहता लघु उद्योग सुरू केले पाहिजेत. महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनले पाहिजे. यासाठी जिजामाता महिला पतसंस्था नेहमीच प्रयत्नशील राहत आली आहे.  महिला बचत गटासाठी हे इ बुक मार्गदर्शक ठरेल. त्यासाठी हे इबुक मोफत दिले जाणार आहे.  ”

          बचत गटाच्या योग्य व्यवस्थापणासाठी आवश्यक असणार्‍या नियमावलीचे या पुस्तकात सोप्या भाषेत मांडणी केली आहे. बचत गट नोंदणी करताना आवश्यक अर्ज, बँक खाते उघडताना आवश्यक असणारे ठराव नमूना आणि बरेच अर्ज नमुने या इ बुक मध्ये दिले आहेत. त्याच बरोबर गटाच्या माध्यमातून  व्यवसाय करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी लागते. हे देखील यात नमूद केले आहे.  हे इ बुक पुर्णपणे मोफत दिले जाणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त बचत गटांनी त्याचा लाभ घ्यावा.
इंक्रेडीबल टेक सोल्यूशन या सॉफ्टवेअर फर्म ने हे इ बुक प्रकाशित केले आहे. बचत गटासाठी आवश्यक असणार्‍या नोंदणी फॉर्म, बँक खातेसाठी आवश्यक ठराव, कर्ज मागणी अर्ज , मीटिंग अजेंडा हे सर्व नमुना अर्ज पीडीएफ स्वरुपात मिळतील.     
इ बुक मोफत मिळवण्यासाठी 9860960529 या मोबाइल नंबरवर इ बुक असा मेसेज करावा. 


test banner