आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असते पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर, मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात. आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावं अशी शरीराची आणि मनाची अवस्था. भक्कम / धडधाकट शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. उदाहरणच दयायचे झाले तर, घरातील कंदील, कंदिलाची कडी, काच किंवा वाट जास्त करण्याचा स्क्रू खराब असला तरीही तो कंदील आपण वापरू शकतो पण त्यातला एखादा भाग बिघडलेला असेल तात तो कंदील संपूर्णपणे कार्यक्षम आहे असे म्हणता येईल का? अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल , कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण य्ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का? आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्टया सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थाच्या मुख्य निकष आहे.
आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते.