हैदराबाद पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे
मंगळवेढा(प्रतिनिधी )डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेला बलात्कार आणि त्यानंतर त्याना पेटवून देऊन त्यांची केलेली हत्या, हा भारत देशातील महिलावर्गाला काळिमा फासणारी क्रूर घटना आहे या घटनेचे तीव्र पडसाद देशामध्ये उमटत असतानाच बलात्कार करणाऱ्याना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून भारत देशातील नागरिकांची मागणी होत होती दिल्लीमधील निर्भया बलात्कार प्रकरण असेल, किंवा मुंबईमधील महिला पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार असेल,किंवा कोपर्डी मध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केली असेल, अश्या अनेक बलात्काराची प्रकरणे घडलेली असल्यामुळे आणि अजूनही त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे याही प्रकरणांमध्ये असेच होणार असे वाटत असतानाच हैदराबाद पोलिसांनी ज्या नराधमांनी बलात्कार केला त्यांना गोळ्या घालून खात्मा केला आणि एकप्रकारे असा संदेश दिला आहे की जो कोणी भविष्यमध्ये अशाप्रकारे बलात्काराचे कृत्य करतील त्यांना एन्काऊंटर करूनच ठार मारण्यात येईल
हैदराबाद पोलिसांनी केलेली कारवाई न्यायप्रक्रियेला धरून नसली तरीसुद्धा पोलिसांचा वचक असल्याशिवाय अशाप्रकारच्या बलात्काराच्या घटना कमी होणार नाहीत म्हणून पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैलाताई गोडसे याने दिलेली आहे
त्यांनी असेही नमूद केले आहे की एन्काऊंटर करून गोळ्या घालून ठार मारण्या पेक्षा भरचौकामध्ये जाहीर गोळ्या घातल्या असत्या किंवा जाहीर फाशी दिली असती तर भविष्यामध्ये अशा घटना करताना शंभरवेळा विचार करावा लागला असता
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता यापुढे बलात्कार करणे म्हणजे इन्काऊंटर द्वारे स्वताःच्या मृत्युला सामोरे जावे लागणार आहे
न्यायव्यवस्था नुसार कार्यवाही होणे अपेक्षित असले तरी न्यायालयांमध्ये अनेक वर्षांनी वर्षे प्रकरणे प्रलंबित राहतात त्यानंतर अशा घटना लोकं विसरून जातात बलात्कार करणाऱ्यावर वचक बसवायचा असेल तर कधी कधी अशा घटनांमध्ये गोळ्या घालून ठार मारले पाहिजे किंवा चौकामध्ये जाहीररीत्या फाशी देण्याचा कायदा केला पाहिजे तरच आपल्या देशातील बलात्काराच्या घटना कमी होण्यासाठी मदत होईल असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे