मंगळवेढ्यात आध्यात्मिक दिवाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

मंगळवेढ्यात आध्यात्मिक दिवाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन



प्रतीनिधी :

दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन कान्होपत्रा स्मारक मंदिर डोंगरगाव पाटखळ रोड येथे आयोजित केले आहे.

जगविख्यात प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचन कीर्तनाचा आध्यात्मिक आनंद घेण्याची संधी मंगळवेढेकराना उपलब्ध झाली आहे.

याच बरोबर डॉ. आ.गो. पुजारी सर लिखित संत चोखामेळा व परिवार व समग्र अभंग गाथा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते आयोजित केला आहे.

साधारण मागच्या कार्तिकी वारीला कान्होपत्रा स्मारक मंदिर उभारले आणि त्यावेळी ह.भ.प. भगवती महाराज सातारकर  उपस्थित होत्या त्यावेळीच प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी सरांनी येथे संत साहित्य दर्शन ग्रंथालय उभारणार असल्याचा संकल्प केला होता. तो या निमित्ताने सिद्धीस जात आहे तोही ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या उपस्थितीत

मंगळवेढ्यातील नागरिकांना ही अपूर्व संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा