मंगळवेढा ( प्रतिनिधी ) पंढरपूरची निवडणूक जिंकण्यासाठी काही डमी उमेदवार रिंगणात उभे केले आहेत त्यांना ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांना प्रचंड मताने विधानसभेत पाठवावे असे आवाहन प्रसिद्ध वक्ते सुषमा अंधारे यांनी मरवडे येथे भारत भालके यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत केले.
यावेळी व्यासपीठावर भारत बेदरे पी बी पाटील संगीता कट्टे रामचंद्र वाकडे धनजय पाटील अर्जुन पाटील विजयकुमार खवतोडे उपस्थीत होते.
या वेळी बोलताना अंधारे यानी भारतीय जनता पक्षाने आपल्या जातीवादी चेहरा दाखवायला सुरुवात केली असून विनोद तावडे एकनाथ खडसे चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला काढण्यात आले असून. बहुजनांचा त्यांना तिटकारा आहे हे सगळ्या घडामोडीतून दिसून येत आहे. श्रीपाद छिंदम राम कदम यासारख्या माणसांना भाजप जवळ करतो यातच त्यांची वृत्ती दिसत आहे. आज सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढले असून नोकऱ्या मिळत नाहीत सरकारी नोकरी भरती बंद झाल्यामुळे अनेकांना काम मिळत नाही. ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी आली आहे साडेसहा टक्के चा जीडीपी पावणेचार टक्के वर आला असून अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. पाच वर्ष राज्य मोर्चे काढण्यात थकून गेले असून समाजातला कुठल्या ही घटकाना सरकार न्याय देऊ शकले नाही. निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली असून जनशक्तीचा विजय निश्चित आहे सबंध महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना समाजातील सर्व स्तरातून वाढणारा पाठिंबा सरकार बदलले शिवाय राहणार नाही.वयाची सत्तरी झालेल्या कोणत्याही उमेदवाराला महाराष्ट्रात उमेदवारी दिली जाणार नाही हा भाजपने केलेला नियम केवळ कोथरूड येथे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात होत असलेल्या ब्राह्मण समाजाच्या विरोधामुळे तडजोड म्हणून पंढरपूर येथे सुधाकर परिचारक यांनी उमेदवारी जाहीर करून मोडला असून मतदारांनी मात्र त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन केेले .यावेळी आ भारत भालके अड राहूल घुले अनिता नागणे चंद्रकांत घुले प्रवीण खवतोडे संतोष पवार यानी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक लतीफ तांबोळीने तर सुत्रसंचालन हैदर केंगार यानी केले.