प्रतिनिधी :
मंगळवेढ्यात दिनांक १०/ १० / २०१९ रोजी दुपारी
३.०० वाजता आठवडा बाजार पेठ येथे राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पक्षाचे
उमेदवार श्री. भारतनाना भालकेंसाठी प्रचार सभा घेणार आहे.
पक्षाचे स्टार प्रचारक आणि युवकांचे युथ आयकॉन
बनलेले खासदार सोलापूर दौर्यावर आहेत. त्याच्या सभांना महाराष्ट्रभर गर्दी होतेय.
दस्तूर खुद्द शरद पवार साहेबांनी “ त्यांच्या सभांची महाराष्ट्रभर खूप डिमांड आहे ”
अशी जाहीर भाषणात कबुली दिली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धानपर्यंत त्यांचा चाहता
वर्ग आहे.
ही निवडणूक
ही युवकांच्या हाती असल्याचे प्रत्येक राजकीय पक्ष जाणून आहे. त्यामुळे त्यांना आकर्षित करणारे आजच्या घडीचे नेते राष्ट्रवादी मैदानात उतरवत आहे.
तालुक्यातील युवक वर्ग भालकेंच्या पाठीशी आहेच त्यातच अमोल कोल्हेची लोकप्रियता आणि वक्तृत्वाने छाप पडण्याची कला भालकेंच्या फायद्याची ठरणार
हे नक्की.
आघाडीच्या आणि
पक्षाच्या उमेदवारासाठी सोलापूर जिल्ह्यात दिवसभर सभा घेणार आहेत.राष्ट्रवादीच्या ताफ्यात असणार्या मुलुख मैदानी तोफा जिल्ह्यात धुमाकूळ घालणार असच दिसतय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाची लहर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा