आ.प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा शहरात पदयात्रा पदयात्रेस युवकांचा मोठा प्रतिसाद - Sanwad News

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

लवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

आ.प्रशांत परिचारक यांची मंगळवेढा शहरात पदयात्रा पदयात्रेस युवकांचा मोठा प्रतिसाद


मंगळवेढा (प्रतिनिधी ) मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात व परिसरा मध्ये आ.प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली.

याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा,जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य अजित जगताप,माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे, माजी उपनगराध्यक्ष वसंत मुदगुल,सोमनाथ माळी,युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे,शशिकांत चव्हाण, संतोष मोगले,नगरसेवक प्रशांत यादव,सतीश म्हेत्रे,बशीर बागवान,अरुण किल्लेदार,शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,विजय बुरकुल,सुरेश जोशी,डी.के.दत्तू,औदुंबर वाडदेकर,मोहन जोशी,युनुस शेख,चंद्रशेखर कोंडुभैरी,मुझफर काझी,खन्ना माळी,बबलू सुतार,माधवानंद आकळे,नागेश डोंगरे,संभाजी घुले,यांच्यासह विविध संस्था- मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या पदायात्रेस ग्रामदैवत गैबीपीर दर्ग्याचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली.या पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात युवक व नागरिक सहभागी झाले व काही ठिकाणी वैयक्तिक भेट घेऊन येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या माध्यमातून आपण विकासकरूयात म्हणत कमळ या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

आ.प्रशांत परिचारक यांनी मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.घरोघरी जाऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले .यावेळी गावातील सर्व गट तट विसरून आमदार प्रशांत परिचारक यांच्या कामाची पावती म्हणून पदयात्रेत लोक स्वतः हुन मोठ्या संख्येने सामील झाले होते. या पदयात्रेस युवकांचा भरघोस प्रतिसाद पाहायला मिळाला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा