प्रतिनिधी : “ भारतनाना ही भर पावसात उभी असलेली जनता प्रचार सभेसाठी
नसून विजयी सभा म्हणूनच इथे आली आहे आता तुमची हॅट्रिक पक्की आहे ” मंगळवेढ्यात आज
प्रचारासाठी आलेल्या खा. डॉ. अमोल कोल्हेनी हे उद्गार काढले.
आठवडा बाजारात तालुक्यातून जमलेल्या प्रचंड जनसागराने २००९ च्या
विजयी सभेची आठवण बर्याच जणांना झाली. विरोधकांवर प्रचंड वार करत भारतनानानी त्यांच्या
भावना मांडल्या. १० वर्षातील कामांचा आढावा त्यांनी जनतेसमोर ठेवला. ४० गावाच्या पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न कसा मार्गी लावला हे सविस्तर संगितले. विरोधी पक्षातला आमदार म्हणून
होणारी अडवणूक झुगारून १० वर्षे जनसेवेत वाहून घेतल्याने मनाला विजयाची खात्री असल्याचे
त्यांच्या भाषणातून जाणवत होते.
अमोल कोल्हे भाषनाला उभे राहिले तेव्हा पावसाला सुरवात झाली. पण
डॉ. अमोल कोल्हेना ऐकण्यासाठी लोक भर पावसात उभे होते. त्यामुळे नेत्यावर असलेलं प्रेम
पाहून कोल्हे भारावून बोलले “ पत्रकार बंधुनो , तुम्ही सकाळची गर्दी पहिली असेल आणि आता भर पावसात उभा असलेला हा जनसागर पाहून
तुम्ही उद्या सकाळ्याच्या हेडलाईन काय लिहिणार
? ”
कारण सकाळीच मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती. त्यांच्या शिस्तबद्ध
कार्यक्रमाला जमलेल्या गर्दीपेक्षा ह्या सभेला खूप गर्दी असल्याने राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांना उत्साहाचा डोस मिळाला असणार हे नक्की.
ग्रामीण भागातून सभेसाठी आलेल्या सामान्य लोकांची संख्या लक्षणीय होती. महाराष्ट्रात
मा. शरद पवारांना मिळणार्या प्रतिसादाचे लोन आता मंगळवेढ्यात सुद्धा पोहचले असल्याची
ही निशाणी होती. राष्ट्रवादीसाठी मंगळवेढ्यात आजचा हाय होल्टेज गुरुवार खा. डॉ. अमोल
कोल्हेच्या सभेने जिंकला असाच म्हणावे लागेल.