रासप महायुतीतून बाहेर पडणार ? - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

रासप महायुतीतून बाहेर पडणार ?


     
                                                                      विशेष प्रतिनिधी | दौंड व जिंतूर मतदार संघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आला होता. मात्र या मतदार संघातील उमेदवारांना भाजपचे एबी फोर्म दिले गेल्याने नाराज असलेले महादेव जानकर यांनी मुंबई येथील पक्ष कार्यालयात प्रमुख पदाधिकारर्‍यांची तातडीची बैठक बोलावली होती. सदर बैठकीत महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


मित्रपक्षांच्या जागांवर आपले उमेदवार उभे करुन भाजपने विश्वासघात केल्याची भावना जानकर यांची झाली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात मित्रपक्ष असताना देखील भाजपने राहुल कुल यांना एबी फोर्म दिल्याने जानकर दुखावले असल्याचे बोलले जातेय.

महादेव जानकर उद्या सोमवारी महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडला तर याचा भाजपला मोठा धक्का असणार आहे. जानकर आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

test banner