मंगळवेढा ग्रामीण भागात आ. भारत भालकेंचे “ तूफान आलया ” - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

मंगळवेढा ग्रामीण भागात आ. भारत भालकेंचे “ तूफान आलया ”


प्रतिनिधी
सहा महिन्यापासून विरोधकांना गॅसवर ठेवत जनतेशी कनेक्ट असलेल्या भारत नानांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करत सुरवातीलाच विरोधकांना बॅकफुट वर ढकलले होते.
बदलत्या राजकीय घडामोडीचा किंचितही फरक न जाणवू देता निवडणुकीत मुसंडी मारली आहे. उस्फूर्तपणे लोक बोलताना पाहून त्यांना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढताना दिसत आहे.
 आठवडा बाजारात,  पारावर, चौकात, डेअरीवर , शेतात कुठेही चर्चेचा सुर “ यावेळी पण आमदार नानाच होणार ” असाच आहे. काही सामान्याच्या थेट प्रतिक्रिया अश्या आहेत.
“ नुसत्या फोनवर आम्हाला एका दिवसात डिपी बदलून मिळाला. ”
 “ दवाखान्याच्या टायमाला नानाच मदत किली हुती. ”
“ आजवर आमच्या कड  आमदार म्हणून आलेले राम,  लक्ष्मण आम्हाला २५ वर्षात सत्तेत असून पाणी देवू शकले नाहीत पण ह्या वाघाने विरोधात असून प्यायच्या पाण्याचा प्रश्न मिटवला. ”
 “ आमच्या गावात कुणाच्याही सुखादुखाच्या प्रसंगी आमदार उपस्थित असतात त्यामुळे प्रत्येकाला ते कुटुंबातीलच वाटतात. आमदारकीचा कधीच आव आणत नाहीत.  ”
“ आमच्या गावात प्रत्येक घरात पुढारी आहे. नानाच्या आधीच्या आमदारांने नुसती भांडण लावून याला आत टाक त्याला जिरव एवढच राजकारण केल. पण नाना आमदार झाल्यापासून ह्या १० वर्षात आमच्या गावातले असले जिरवा जिरवीचे कार्यक्रम बंद होवून लोक कामाचं काय ? असे विचारू लागलेत.”


यातून बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतात. आमदारांची काम करण्याची थेट पद्धत लोकांना आपलेसे करणारी आहे.
तालुक्यात वीज टंचाई दूर करण्यासाठी व अखंडितपणे विज राहण्यासाठी सहा ते सात नवीन स्टेशन उभारणी केली तसेच भाळवणी येथे 132 के व्ही ए चे वीज केंद्र झाल्यामुळे शेतकरी खुश आहे.
शेतकऱ्यांना पीक विमा चारा छावण्या, पाण्याचे टँकर ,उजनीचे पाणी देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे परिणाम दिसून येत आहेत. तालुक्यातील तीर्थक्षेत्र ,रस्ते विकसित  करण्यासाठी निधी आणला अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कोतवाल, ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून दिला
 प्रशासकीय कामातील अडचणी समोरासमोर संपर्क करून तत्काळ सोडवल्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला आहे. मागील २० वर्षात सत्तेत असण्यार्‍या आमदारांनी थापा मारून वेळ मारत नेली पण विरोधी पक्षातला आमदार असून ४० गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबवून सोडवला. आधीची पाण्यासाठीची वणवण अनुभवल्यामुळे सध्या उस्फूर्तपणे ग्रामस्थ त्यांचा प्रचार करताना दिसत आहे.
फक्त निवणुकांमध्ये भेटायला न येता एरव्ही सुखदुखाच्या प्रसंगी उपस्थित राहण्याने आपुलकीचे नाते झाले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सामान्य लोकांची भावना “ हा आपला माणूस आहे ” अशीच बनली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सध्या घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे महाराष्ट्रातील युवक वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे. त्याचा फायदाही आ. भारत भालकेंनाच होताना दिसत आहे. बरेच जण आपल्या नातेवाईकांना, पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना भेटून किंवा  फोनवर विनंती करत आहेत  “ नानाच्या घड्याळाला मत द्या ” .
सामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाट निर्माण झाली आहे. या उलट विरोधी उमेदवाराकडे पोकळ आश्वासनाशिवाय ठोस अस काहीच नाही.  लोकांचा उत्साह पाहून “ आ.भारतनानाच तूफान आलया ”असच चित्र सध्या दिसत आहे.
test banner