कासेगावात धडाडणार विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडेची तोफ - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१९

कासेगावात धडाडणार विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडेची तोफ



प्रतीनिधी :
राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार आ.भारतनाना भालकेंच्या प्रचारासाठी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आ.धनंजय मुंडे पंढरपूर तालुक्यातील कासेगावात सोमवारी १४ आक्टोबर २०१९ ला सकाळी ११.३०वा येणार आहेत. त्यांची अभ्यासू आणि  आक्रमक शैली प्रत्येक सामान्य माणसाला आवडणारी आहे. विषयाची मांडणी प्रभावीपणे करण्यात तरबेज असल्यामुळे ,अल्पावधीतच लोकप्रिय व्यक्तिमत्व बनले आहेत.
महाराष्ट्रातील तरुणाईत धनू भाऊ म्हणून ते जवळीक साधताना दिसत आहेत. सोशल मीडियात त्यांचे फॉलोवर्स लाखोंच्या संख्येने आहेत.  सत्ताधार्‍यांना धारेवर धरणारा नेता अशी त्यांची प्रतिमा बनली असून त्यांचे वलय आज संपूर्ण महाराष्ट्राभर पसरत आहे. राष्ट्रवादी त्यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ भक्कम करण्याची योजना पद्धतशीर पणे राबवत आहे. मागच्या सभेत खा.डॉ.अमोल कोल्हेनी मंगळवेढ्यात भर पावसात सभा घेत उपस्थित जनतेची मने जिंकली. तो प्रभाव तसाच वाढवत नेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कडून केला जात आहे. जनतेचा सभांना मिळणारा जोरदार प्रतिसाद हा राष्ट्रवादीसाठी उत्साह वाढवणारा आहे.

test banner