पंढरपूर-मंगळवेढा मतदरसंघाचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासठी आपण मला विधानसभेत पाठवा- समाधान आवताडे  - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर-मंगळवेढा मतदरसंघाचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासठी आपण मला विधानसभेत पाठवा- समाधान आवताडे 

     
                                                                      मंगळवेढा  [आयुष धोत्रे ] पंढरपूर-मंगळवेढा मतदरसंघाचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासठी आपण मला विधानसभेत पाठवा असे आवहान मतदारसंघाचे उमेदवार  समाधान आवताडे यांनी केले

ते माचणूर येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात सकाळी 9 वा.आयोजित केलेल्या प्रचार सभारंभात बोलत होते.यावेळी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान आवताडे यांचे आगमन झाल्यानंतर मंगळवेढा-सोलापूर रोडवरील श्रीकृष्णाच्या मठापासून ते सिध्देश्वर मंदिरा पर्यत त्यांनी स्व:ता ट्रॅक्टर चालवत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

पुढे बोलताना ते म्हणाले की,मतदार संघातील प्रलंबित  विकास कामासाठी व बेरोजगारी संपण्यासाठी ही निवडणूक मी लढवत असून या माध्यमातून मला मतदार संघात विकासाची गंगा आणायची आहे. 20-25 वर्षात या मतदार संघात कोणतेही ठोस काम झाले नाहीत.परंतु हे नेते मंडळी आपापसात भांडत बसली असून मतदार संघाच्या विकासाचे न बोलता हे मतदार संघाची दिशाभूल करत आहेत.मला सुरवातीला शेतकरी,
कष्टकरी,आरोग्य, पाणी,शिक्षण व पंढरपूर शहरातील अशांतता हे प्रश्न प्रामुख्याने सोडवायचे आहेत.त्यामुळे ट्रॅक्टरच्या माध्यमातून मतदार संघाच्या विकासाची पेरणी करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असेही आवाहन शेवटी आवताडे यांनी केले.

विठ्ठल शुगरचे माजी संचालक शेखर भोसले,दत्तात्रय जमदाडे, ब्रम्हपुरीच्या डाॅ.वृषाली पाटील,अमोल माने,चि.यशराज नांदे,
लाडीक डोके,विलास सरवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष अमोल माने,बठाण सेवा सोसायटीचे चेअरमन सुब्राव बेदरे,माजी सरपंच विकास बेदरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे  गौडाप्पा पाटील, यांनी समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत आवताडे गटात प्रवेश केला.

यावेळी समाज कल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण,मार्केट कमिटीचे माजी चेअरमन विष्णूपंत आवताडे, पंचायत समितीचे सभापती प्रदिप खांडेकर, दामाजी शुगरचे व्हा चेअरमन अंबादास कुलकर्णी,मार्केट कमिटीचे चेअरमन सोमनाथआवताडे,शिवसेना माजी तालुकाप्रमुख येताळा भगत,शिवसेना माजी तालुकाप्रमुख गणेश गावकरे,जि.प सदस्य दिलीप चव्हाण, जि.प.सदस्य मंजुषाताई कोळेकर,
ब्रम्हपुरीचे माजी सरपंच विजयसिंह पाटील,बठाणचे प्र.सरपंच बिभीषण बेदरे, माचणूरचे माजी सरपंच सुनिल पाटील,माजी उपसरपंच जालिंदर डोके,दामाजी शुगरचे सचिन शिवशरण,
राजीव बाबर,सुरेश भाकरे,भारत निकम,एकनाथ जगताप,लेबर फेडरेशनचे संचालक सरोझ काझी,चंद्रकांत पडवळे,दामाजी नगरचे अॅड.दत्तात्रय तोडकरी,रहाटेवाडीचे सरपंच गोपाळ पवार,माचणूरचे माजी उपसरपंच विलास डोके,खंडू खंदारे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिगंबर यादव,सुत्रसंचालन अशोक उन्हाळे तर आभार सचिन शिवशरण यांनी मानले.


त्यानंतर ब्रम्हपुरी येथे समाधान आवताडे यांचा प्रचाराची काॅर्नर सभा संपन्न झाली.यावेळी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सज्जन पाटील यांनी समाधान आवताडे यांचा सत्कार केला. मुरलीधर पुजारी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी दामाजी शुगरचे संचालक राजनभैय्या पाटील, माजी सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच आण्णासाहेब पाटील,प्रताप पाटील, दत्तात्रय पुजारी, माणिक कोळी, ज्ञानोबा कोकरे, माजी उपसरपंच अनंत पाटील यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
test banner