मंगळवेढा(प्रतिनिधी) आमदारांला राज्यातील प्रश्न विचारणारा अधिकार असताना 25 वर्षे मंगळवेढ्यातील पाणीप्रश्न माहित नव्हता आताच कसा सोडवू म्हणतात असा आरोप आ.भारत भालके यांनी केला
प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील आंधळगाव येथे ते बोलत होते.यावेळी लतीफ तांबोळी संभाजी गावकरे परमेश्वर आवताडे हर्षराज बिले पांडूरंग चौगुले रामचंद्र मळगे ईश्वर गडदे काशीनाथ पाटील पांडूरंग भाकरे महादेव माळी रामचंद्र लेंडवे सत्यवान लेंडवे संतोष शिंदे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आ भालके म्हणाले की 2014 ला पाणी देतो म्हणणारे आताही पाणी देतोच म्हणतात म्हणून पाण्याबाबत लबाड बोलणारे विधानसभेत पाठवू नका,तीन महिने पाठपुरावा करूनही पुराचे पाणी दिले नाही.या सरकारला तोंडाला पावडर लावलेली चालतात पण दुष्काळात तोंड करपलेली चालत नाहीत.267 प्रश्न विधानसभेत विचारणारा तुमच्या समोर आणि 2 प्रश्न विचारणारा तुमच्या समोर आहे कामाची तुलना करून मतदान करून
कर्जमाफीच्या माध्यमातून व दुधाचे दर कमी करून शेतकय्राचे कंबरडे मोडले.नियम व निकष लावणारे सरकार उलथून टाका.उद्याच्या निवडणूकीत मला निवडून टाका. अल्पसंख्याक समाजाच्या स्मशानभूमीतून जाणारा महामार्गावर मी लांबून न्यायला लावला.जातीय समीकरणातून धनगर,लिंगायत,उमेदवार देण्याचा प्रयत्न केला ते शक्य झाले नाही म्हणून फोडाफोडी करून मराठा समाजात विभागणी केली 2009 व 2014 ला माझ्या विरोधात असलेले 2019 ला समोर लढत आहेत.
-----------