सुधाकर पंताना निवडून द्या मंगळवेढा तालुक्याचे सोने होईल:-खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०१९

सुधाकर पंताना निवडून द्या मंगळवेढा तालुक्याचे सोने होईल:-खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी



मंगळवेढा (प्रतिनिधी):- 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यात प्रचार सभांचा धडाका जोरात सुरू असून यामध्ये आज दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, सलगर बु,मारोळी, चिक्कलगी, निंबोणी,आंधळगाव, लक्ष्मी दहीवडी,  या गावांमधून आज सर्व सभा संपन्न झाले असून यामध्ये प्रामुख्याने सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज तसेच माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे सर, शिवानंद पाटील, वामनराव माने सर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर (भाऊ) मोरे पांडुरंग परिवार जेष्ठ नेते दाजी (काका) पाटील, अतुल चव्हाण पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानू भाऊ  ढोबळे, आधी मान्यवर या सभेसाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी म्हणाले की मला तुम्ही लोकसभेला मताधिक्य दिले.  तसेच आदरणीय मोठ्या मालकांना तुम्ही चांगल्या मताधिक्‍याने निवडून द्या ते तुमच्या पाणीप्रश्न 100% सोडवतील देशांमध्ये नरेंद्र मोदी व राज्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे यामुळे आमदार प्रचारकांना जास्त कालावधी लागणार नाही प्रश्न सोडण्यासाठी तसेच बाकीच्या काही समस्या तुमच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट त्या मालकांना जाऊन सांगू शकता तुम्ही दहा वर्ष विरोधकांना संधी दिली एकदा शेवटची संधी माननीय सुधाकरपंत परिचारक यांना देऊन बघा या तालुक्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही असेही खा. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी आदरणीय मोठ्या मालकाने सुद्धा मी महायुतीकडून आपला उमेदवार असून मतदान करावे असे सर्व गावातील नागरिकांना आवाहन केले. आंधळगाव येथील सभेत लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या शैलीमध्ये विरोधकांचा खरपूस समाचार घेत आदरणीय श्री सुधाकरपंत परिचारक यांना एक वेळ निवडून देण्याचे आवाहन केले "तुम्ही एक वेळ आमच्यासाठी मत उतारा"
आम्ही तुमच्यासाठी सर्वकाही करण्यासाठी तयार आहे असे यावेळी बोलताना सांगितले.
या सर्व गावातील सभांमध्ये मोठ्या संख्येने आबालवृद्ध व नागरिक  उपस्थित होते.
test banner