मंगळवेढा (प्रतिनिधी) निष्क्रिय नेतृत्व फक्त बोलघेवडेपण करीत असून आपली पुन्हा एकदा फसवणूक करू पाहत आहे. या लबाड लांडग्याला ओळखा आणि विकासप्रिय नेतूत्व असणाऱ्या परिचारक यांना विजयी करा.भालके यांच्या कडून कोणत्याही नवीन संस्थेची स्थापना केली गेली नाही.ते निव्वळ बोलण्यात पटाईत आहेत.ती संस्था सांभाळता आली नाही. परिचारक यांच्या सर्व संस्था सुस्थितीत चालू असल्याचे प्रतिपादन रयत क्रांती संघटनेचे नेते दिपक भोसले यांनी केले.
ते महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील विविध गावभेटी दरम्यान बोलत होते.
पुढे बोलताना भोसले म्हणाले की, एका बाजूला सुधाकरपंत परिचारक यांच्या रूपाने विकासाचे नेतृत्व आहे तर दुसऱ्या बाजूला भकासाचे जनक आहेत. अनेक संस्था मोडकळीस आणून अनेकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम ज्यांनी केले त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.
आपल्या मागील चुकांमुळे आज दोन्ही तालुक्यातील नागरिक 20 वर्ष मागे गेला आणि आज भालकेच्या रूपाने पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होऊ पाहत आहे ते रोखण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, उभं आयुष्य ज्यांनी समाजकार्यात घालवले त्यांना विकासाची दूरदृष्टी आहे,त्यास आपण बळकटी देण्यासाठी आणि सत्तेत असणाऱ्या पक्षाचे आमदार करून आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण आपले मत कमळ या चिन्हाला देऊन सुधाकरपंत परिचारक यांना मतदान करणे म्हणजेच येणार्या काळातील विकासाची मोठी संधी
आहे .त्यामुळेच आपण येणार्या काळात विकासाचे धोरण आखून परिचारक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असेही शेवटी भोसले यांनी सांगितले.
यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ डोणज तालुका मंगळवेढा येथील सभेमध्ये डोणच गावातील ग्रामस्थ व पदाधिकारी रेवणसिद्ध लिगडे सर,
रावसाहेब निगडे,रविकिरण बिराजदार,प्रकाश पाच्छापूरकर, भीमाशंकर पुजारी,ईलाही मुलाणी, बसरा बुगडे,भाजपा अध्यक्ष गुरुस्वामी कोरे,रमेश लिगाडे,आमसिद्ध निगडी, शांतकुमार स्वामी,गौसुल नदाफ, प्रकाश इंगळेश्वर,दत्ताभाऊ शेट्टी, श्रीकांत सावळे,प्रदीप निगडे,राजू कोरे,धोंडप्पा बुगडे,कल्लाप्पा केदार, संगणा मलगुंडे,मल्लिकार्जुन देवपुरी, प्रकाश देवपुरे,दगडू नदाफ,नवीन नदाफ,कस्तुर कोळी आदी उपस्थित होते.