कॉग्रेसचे आमदार भारत भालके यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ हातात - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

कॉग्रेसचे आमदार भारत भालके यांनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ हातात

       
                                                                                  कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके आणि शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करत हातात घड्याळ बांधले आहे.
 राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात आमदार भारत भालके आणि माजी आमदार दौलत दरोडा यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.भारत भालके हे सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहेत. तर दौलत दरोडा हे शहापुरचे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.या दोघांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी स्वागत केले.
test banner