मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने खासदार अमोल कोल्हे सोशल मीडिया वर ट्रोल - - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९

मोहरमच्या शुभेच्छा दिल्याने खासदार अमोल कोल्हे सोशल मीडिया वर ट्रोल -

निवडणुकीच्या प्रचारात लोकांना शुभेच्छा देण्याच्या घाईत आपण काय करतोय हे नेत्यांना कळत नाही.
हा फक्त अमोल कोल्हेंचा एकट्याचा विषय नसून बर्‍याच सोशल मीडिया पुढार्‍यांनी पैसे देवून ग्राफिक डिझाईनर ठेवले आहेत. पण ज्ञान नसलेले डिझाईनर आणि गुडघ्याला बाशिंग बांधलेले पुढारी कशाच्याही शुभेच्छा देत सुटलेत.


राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन मोहरमच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ते सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल होत आहे. Source : Insatagram मोहरम हा महिना शिया पंथाच्या मुस्लीम बांधवांसाठी दुःख देणारा असतो. काळ्या रंगाचे कपडे घालून ते शोक व्यक्त करतात. शिया पंथीय मुस्लीम समाज मोहरमच्या १० व्या दिवशी कडक उपास करतात. सुन्नी समुदायाचे मुस्लीम या दिवशी नमाज अदा करुन शोक व्यक्त करतात. मोहरम हा शुभ सण नाही तर दुःख व्यक्त करण्याचा सण आहे. १४०० वर्षांपूर्वी इमा हुसैन आणि त्यांच्या मुलांना ठार करण्यात आलं होतं. त्याआधी त्यांचे हाल करण्यात आले होते. अशी सगळी पार्श्वभूमी मोहरमला आहे. त्याचमुळे इस्लाम कॅलेंडरच्या दहाव्या दिवशी मोहरम असतो. या दिवसाला रोज-ए-आशुराही म्हटले जाते. हा शोक व्यक्त करण्याचा दिवस असतो शुभेच्छा देण्याचा नाही.
बर्‍याच आजी,माजी , भावी पुढ्यार्‍यांनी शुभेच्छाचा पाऊस पाडला आहे. कुणीतरी आवारा यांना अशी म्हनायची वेळ आली आहे .


test banner