मला माझं स्वातंत्र्य परत द्या; IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने देशात खळबळ - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

मला माझं स्वातंत्र्य परत द्या; IAS अधिकाऱ्याच्या राजीनाम्याने देशात खळबळ

केरळ : केरळमध्ये वास्तव्याला असलेल्या आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथ यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे.
जम्मू-काश्मीरसारख्या राज्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात. तेथील नागरिकांच्या हक्कांची गळचेपी होतेय. अशावेळी कुणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे. त्यामुळे मी माझ्या राजीनाम्यातून सरकारच्या दडपशाहीचा विरोध करतोय, असं कन्नन यांनी म्हटलं आहे.
देशातल्या एका मोठ्या भागात अनेक काळापासून मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. तसेच इतर राज्यांकडून त्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया येत नसल्यानं मला दुःख होतं. असा अन्याय समाजातल्या खालच्या स्तरापर्यंत होत असतो. मला हे स्वीकारार्ह नाही, असं कन्नन म्हणाले.
कन्नन गोपीनाथ ऑगस्ट 2018 मध्ये चर्चेत आले होते. त्यांनी राज्यातील भीषण पुरातून लोकांचं बचावकार्य राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
test banner