मंगळवेढा(प्रतिनिधी) कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही वचननामा घेऊन जनतेपर्यंत आलो होतो. त्यापैकी बऱ्याच वचनांची पूर्तता संचालक मंडळाने केलेली असून त्यामधीलच वचन कारखान्यांमध्ये डिस्टलरी प्रकल्प उभा करणे, त्याची आता मंजुरी मिळालेली आहे. तो प्रकल्प उभारणीस आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. त्याच प्रमाणे सभासदांना दिलेले अभिवचन म्हणजे सभासदास दहा रुपये प्रति किलो साखर देण्याचे वचन ही पूर्ण केलेले आहे. तसेच आपल्या कारखान्यांमध्ये शुगर हाऊसला सायलो सिस्टीम नव्हती तीही आपण कार्यान्वित केलेले आहे. पूर्वीच्या कर्जाचा डोंगर घेऊन कारखान्याचा कारभार करीत आहोत. तरीही सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या कारखान्याचे कामकाज चालू आहे. दामाजी कारखाना हे सभासदांचे मंदिर असून त्याला जोपासण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. आजपर्यंत या मतदारसंघांमध्ये सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. परंतु आतापर्यंत आपल्या पदरात निराशाच पडली आहे. आपण आजपर्यंत फक्त आश्वासनांना भुलत गेलेलो आहे. यासाठीच यावेळी एक संधी देऊन पहा असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले.
आपल्या पुढील राजकिय वाटचाली संदर्भात जनतेशी सुसंवाद साधन्यासाठी सिद्धनकेरी, रड्डे, शिरनांदगी, चिक्कलगी, पौट, माळेवाडी व निंबोणी या गावाचा गाव भेट दौरा केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की स्वतंत्र पूर्वीच्या काळात ज्या अडचणी होत्या त्याच अडचणीमध्ये आपण अजूनही अडकून पडलो आहोत, प्रश्न शासन दरबारी फक्त मांडण्यासाठी नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेले असते येणाऱ्या काळामध्ये या कार्यपद्धतीमध्ये बदल नाही केल्यास पुढील काळ अंधकारमय असणार आहे. यासाठी सर्वांनी मिळून मतदार संघाच्या विकासासाठी पाऊल टाकूया. तसेच मतदार संघातील जनतेला बरे वाटावे म्हणून आत्तापर्यंत पाण्याची फक्त राजकारण करण्यात आले. परंतु खरे वाटण्यासारखे ते कधी वागले नाहीत.
त्याचप्रमाणे पौट गावातील तलावाचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला हवा होता. बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तो प्रश्न मार्गी लागला असता तर अनेक गावच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता.
दौऱ्याच्या प्रसंगी शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, युवराज कांबळे सर, बाळासो होवाळे, मधुकर हत्ताळी आदींनीही आपले मत मांडले.
या गावभेट दौय्राप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, सुरेश भाकरे, रामकृष्ण चव्हाण, भारत निकम, लक्ष्मण मस्के, सुनील लोखंडे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वरील गावातील गिरमल कोरे, हनुमंत कोरे, शिवाजी कोरे, सिद्धाराम कोरे, सकलेश कोरे, उदय माने, रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, भारत पाटील, ज्योतिबा पाटील, युवराज कांबळे, तुकाराम सांगोलकर, मोहन सांगोलकर, पंचायत समिती माजी सदस्य भीमराव कांबळे, नामदेव कोकरे, जयसिंग लोखंडे, सुरेश कांबळे, दुर्योधन कांबळे, शिरनांदगी चे सोसायटीचे मा. चेअरमन जनार्दन थोरबोले, आप्पा चोपडे, पांडुरंग जानकर, पांडुरंग कांबळे, विठ्ठल आसबे, महादेव मासाळ, शंकर थोरबोले, संतोष बिराजदार, गोरखनाथ आलदर, तुकाराम खांडेकर, रमेश काशीद, संतोष बिराजदार, महादेव खताळ, चिक्कलगी सोसायटीचे मा. चेअरमन मीगोंडा बिराजदार, उपसरपंच अमृत उमराणे, बसवंत बिराजदार, यशवंत मुळीक, शिवाजी पवार, संगमेश्वर बिराजदार, भाऊ पवार, बसवंत हत्ताळी, उमेश निकम, शिवगोंडा हत्ताळी, चंद्रकांत लोणी, माळेवाडीचे महांतेश स्वामी साहेब, सरपंच मळसिद्ध माळी, माजी सरपंच सुरेश कोरगोंडे, गोविंद भोरकडे, माळाप्पा माळी, भीमराव भोसले, गुरय्या स्वामी, बाळू भोसले, मल्लाप्पा चौधरी, दयानंद स्वामी, पैटगावचे सरपंच राजू निमंगरे, सोसायटीचे चेअरमन माळाप्पा माने, मा. सरपंच महादेव निमंगरे, पितांबर निमंगरे, चिदानंद बोरकडे, अरविंद सांगोलकर, निंबोणीगावचे सरपंच बबन शिंदे, उपसरपंच भारत सलगर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे, ज्ञानू येडवे, तुकाराम ढगे, तुकाराम खांडेकर सोसायटीचे चेअरमन अंकुश माळी, चंद्रकांत कोळी, गौडाप्पा पाटिल, रेवाप्पा होनराव, मा. सरपंच रंगा बंडगर, खांडेकर गुरुजी, तसेच संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, मा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार सुनिल लोंखडे यांनी मानले