मारोळी -
येथील ग्रामस्थानी लोकांच्या सहकार्याने सांगली व कोल्हापूर जिल्हयातील पूरग्रस्तांना जनतेला अन्नधान्य व रोख पैशाच्या स्वरूपात मदत केली आहे.
मारोळी परिसर गेली कित्येक वर्षापासून दुष्काळाचा सामना करत आहे. दुष्काळी भागातील लोकांचे दुःख काय असते याची जाणिव इथल्या जनतेला आहे. त्यामुळे पूरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जो ओला दुष्काळ पडला आहे.पूरात कित्येक कुटूंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे. या दुःखातून सांगली जिल्हयातील जनतेला सावरता यावे या उदात्त हेतूने मारोळी गावातील जनतेने मदत केली आहे.
गावातील लोकांनी यथाशक्ती धान्याच्या स्वरूपात गहू, ज्वारी, तांदूळ मसाल्याचे पदार्थ , शालेय साहित्य , कपडे व रोख रूपये २० हजाराच्या वरती लोकांनी मदत केली आहे.जीवनाश्यक वस्तू आणि इतर साहित्याचे वेगवेगळे पॅकिंग तयार करून पूरग्रस्ताना पोहच करण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सरपंच बसवराज पाटील यांनी गावातील जनतेनी पूरग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहानाला प्रतिसाद देत लोकांनी सढळ हातांनी मदत केली आहे.
गावात जाऊन लोकांकडून भुजंगा सर्जे व अशोक अगसर यांनी धान्य व कपडे आणि रोख स्वरूपात पैसे गोळा करुन त्याचे योग्य नियोजन करून सोमवारी सांगली जिल्ह्यात रवाना झाले. प्रसंगी एम.एल.पाटील सर, शिवकुमार पाटील ( पोलीस पाटील) नागराज जमखंडी, सचिन पाटील, रेवण लवटे , संगाण्णा तांबे , संदीप लोखंडे , रेवण रवी आदी उपस्थित होते.