कोर्टीच्या शांतीनिकेतन गुरुकुलने जिंकला ‘पोलीस-विद्यार्थी मैत्री चषक २०१९’
पंढरपूर-‘हा हॉलीबॉलचा सामना पराभूत झालेल्यांनी ही केवळ शेवटची संधी नसून भविष्यात अनेक संधी निर्माण कराव्या लागणार असून प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी आपल्या हाताच्या मनगटावर विश्वास ठेवून यश मिळवायचे असते. त्यासाठी इतर कोणावरही विसंबून न राहता आपल्याच प्रयत्नात सातत्य ठेवावे. एक वेळ अशी येते की, पराभूत होत असतानाच अविश्वासनिय विजय मिळून जातो. हाच बोध या स्पर्धेतून घ्यावा आपल्या जीवनात देखील यशस्वी व्हायचे असेल तर प्रयत्नात सातत्य आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातर्फे स्वेरीच्या ग्राऊंडवर ‘पोलीस-विद्यार्थी मैत्री चषक २०१९’ हॉलीबॉल स्पर्धेच्या पारितोषक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे मार्गदर्शन करत होते प्रारंभी निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनीपोलीस ‘विद्यार्थी मैत्री’ संबंधी सविस्तर माहिती दिली. हॉलीबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोर्टीच्या शांती निकेतन गुरुकुल संघाने आंबे येथील जिजामाता प्रशाला संघाला पराभूत करून अजिंक्यपद मिळविले तर डी. ए. व्ही. करकंब संघाला तृतीय क्रमांकावरच समाधान मानावे लागले. संपुर्ण हॉलीबॉल सामन्यामधून शांतिनिकेतन गुरुकुलचा नेताजी गौतम निराधार या खेळाडूने उत्कृष्ट खेळ केल्यामुळे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. सामन्याचे परीक्षक म्हणून विशाल मोहिते, सागर धोत्रे, प्रशांत गायकवाड व गोविंद माने यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. संपूर्ण सामन्यांचे नियोजन, स्पर्धकांची व्यवस्था यामुळे खेळाडूमध्ये आलेली उर्जा पाहून पोलीस खात्याने स्वेरीला ‘विशेष सन्मानपत्र’ देऊन गौरव केला. यावेळी निर्भया पथकाचे प्रमुख गजभारे यांनी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, स्वेरी कॅम्पचे इन्चार्ज प्रा.एम. एम. पवार, प्रा. रामेश्वर सोळगे, क्रीडा सहाय्यक रजनी वाघमोडे, प्रा. हरी आयवळे, प्रा. रेवण साळुंके, रोकडे, पंढरपूर तालुका हॉलीबॉल असोसिएशनचे विष्णु शिंदे, नवले यांच्यासह आदींचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. स्वेरीच्या मैदानावर झालेल्या दोन दिवसातील या स्पर्धेमुळे स्पर्धकांच्या माध्यमातून पोलीस आणि जनता आणखी जवळ आल्याचे स्पष्ठ दिसून आले. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे आणि पंढरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वाखाली ‘पोलीस काका आणि पोलीस दिदी’ ही संकल्पना पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या निर्भया पथकातील टीमने प्रचंड मेहनत घेऊन यशस्वी राबविले. यावेळी पंढरपूर शहरचे पो.नि. दयानंद गावडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील भिंगारे यांनी केले तर पारितोषक वितरणाने कार्यक्रमाची सांगता केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा