*वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने तालुक्याला 16 कोटीचा निधी खेचून आणता आला:--समाधान आवताडे* - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

*वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने तालुक्याला 16 कोटीचा निधी खेचून आणता आला:--समाधान आवताडे*


मंगळवेढा-(प्रतिनिधी)आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेंतर्गत व विविध विकास कामासाठी आपल्या तालुक्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे व समाजकल्याण सभापती शिलाताई  शिवशरण यांच्या माध्यमातून जवळ जवळ 16 कोटीच्या आसपास निधी आणला असून पंगतिला बसल्यावर वाडणारा वाडप्या ओळखीचा असल्याने जसा फायदा होतो तसाच या दोघांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोठा फायदा झाला असल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले.

ते राजकीय वाटचाली संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी गावभेट दौरा मुढेवाढी,ब्रम्हपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिध्दापुर, बोराळे, अरळी व नंदुर येथे आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

पुढे बोलताना आवताडे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून तालुक्यातील विविध महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असल्याने जनतेने पंचायत समिती व जिल्हा परिषद आमच्या ताब्यात देऊन विश्वास दाखविला त्याच्या बळावर आम्ही आजपर्यंत तालुक्यातील जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करत आलो आहे.या दोन्हीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास,रस्ते,सर्व प्रकारच्या घरकुल योजना असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून गरजू जनतेला द्यावयाच्या विविध वस्तू असतील ते पोहचवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. रमाई घरकुल योजनेंतर्गत व विविध विकास कामासाठी आपल्या तालुक्यातील कामासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळ जवळ 16 कोटीच्या आसपास निधी आपण खर्च केला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला लोकसंख्येचा आधारावर रमाई घरकुल योजनेंतर्गत घरकुल वाटप करण्याचे ठरल्यानंतर आपल्या तालुक्यासाठी 500 घरकुलांचा कोठा देण्यात आला.परंतु 961 घरकुलांची मागणी असल्याने ती मागणीही जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष संजयमामा शिंदे व समाजकल्याण सभापती शिलाताई शिवशरण यांच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यात आली. तसेच सोलापूर जिल्हाची वरदायीनी  असलेले उजनी शंभर टक्के भरले असतानाही आपली पिके आपल्या हातात नाहित. हेच जर पाण्याचे नियोजन योग्य झाले असते तर आज आपली पिके आपल्या हातात असती.त्यामुळे येणाय्रा काळात जर आपण पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने नाही केले. तर आपल्यावर खुप मोठे जलसंकट येऊ शकते. त्यातच आपल्या तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर आपल्याला फक्त गाजरच दाखवण्यात आलं. त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून सुशिक्षित तरूण आज भरकटत चालला आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. त्या येणाय्रा काळात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता गट-तट,भेदभाव न मानता जशी आपण यापूर्वी मला साथ दिली तसीच साथ यावेळीही द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली. आज पर्यंत केवळ आश्वासने देवुन राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम झाले आहे. संध्याची पिडी तर गेली आहेच निदान पुढील पिढीसाठी तरी सर्वानी एकत्र येण्याची आहे असे शेवटी समाधान आवताडे म्हणाले.

याप्रसंगी शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, लाडीक डोके, सुरेश पवार, गावकरे सर, संचालक सचिन शिवशरण यांनीही आपले विचार व्यक्त केले.

या भेटीच्या वेळी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक राजीव बाबर, शिवयोग्याआप्पा पुजारी, प्रमोदकुमार म्हमाणे, भारत निकम, मच्छिंद्र घोडके, अण्णासो चौगुले, भारत धसाडे, लक्ष्मण धसाडे, सुभाष पाटील, ब्रह्मपुरीचे उपसरपंच आण्णासो पाटिल, आनंद पाटील, संजय पाटील, भारत पवार, अनिरुद्ध पाटील, बाळू मोरे, दत्तात्रय यादव, माणिक कोळी, मधुकर कोकरे, दत्तात्रय पुजारी, सतीश पवार गुरुजी, प्रमोद बिनवडे, सिद्धेश्वर कोकरे, किशोर देशमुखे, त्रिंबक यादव-पवार, हरिदास गुरव, माचणूर सोसायटीचे चेअरमन विलास सरवळे, माजी उपसरपंच विलास डोके, बळीराम डोके, ग्रामपंचायत सदस्य लाडी डोके, विठ्ठल डोके, सुखदेव कलुबर्मे, प्रकाश डोके, आनंदा मेटकरी, दगडू पवार, जालिंदर डोके, मुरलीधर पुजारी, चंद्रकांत कलुबर्मे, कांबळे गुरुजी, राहाटेवाडीचे सरपंच गोपाळ पवार, दामाजी कारखान्याचे मा. संचालक जगदीश पाटील, माजी सरपंच श्याम पवार, दीपक पवार, पंडित पवार,बजीरंग पवार,  सोसायटीचे माजी चेअरमन भागवत जाधव, धनंजय पवार, मार्केट कमिटी संचालिका सौ. मालन गायकवाड, महादेव चौगुले, तंटामुक्ती मा. अध्यक्ष महासिद्ध मळगे, पंढरी मळगे, सतीश भोसले, शंकर मळगे, तामदर्डी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दादासो पुजारी, सरपंच विराप्पा पुजारी, सोसायटी चेअरमन मोतीराम पूजारी, बळीराम शिंगारे, ग्रामपंचायत सदस्य दगडू आसबे, तंटामुक्त अध्यक्ष भीमराव आसबे, सुभाष होनमाने, अवधूसिद्ध पुजारी, चंद्रकांत पाटील, सिद्धापूरचे तिपन्ना सिंदखेड, मातुर्लिंग ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासो पाटील, सुरेश पवार, प्रताप सिंह रजपुत, गपूर चाचा, रामलिंग रजपूत, सिद्धाराम कोळी, विजयकुमार भरमगोंडे, बोराळे सोसायटीचे मा. चेअरमन डॉ. नितीन बनसोडे, एबी पाटील, मोहन धनवे, संतोष गावकरे सर, दादासाहेब चौगुले, नागनाथ पाटील, प्रकाश कोरे, हनुमंत कवचाळे, अविनाश गणेशकर, अण्णा भोजने, राजकुमार गणेशकर, सुभाष नकाते, रामलिंग नकाते, मनोज कवचाळे, शबीर पारकनाळे, दामाजी कारखान्याचे मा.संचालक जगंन्नाथ कोकरे, अरळी सोसायटीचे चेअरमन आणाप्पा चव्हाण,  पंचायत समिती मा.सदस्य रावसाहेब राजमाने, सोसायटी मा.चेअरमन शिवाजी मोहिते, उपसरपंच श्रीकांत तोरणे, कामसिंग स्वामी, सुरेश सोमगोंडे, गंगाराम कुंभार, निलकंठ बसनाळे, शिवयोगी सरसंभी, सुभाष मोहिते, मळसिध्द कुंभार, अर्जून पुजारी, महादेव सोमगोंडे, सोमनाथ तोरणे, विठ्ठल सोमगोंडे, नंदुरचे दामोदर कांबळे, उपसरपंच परमेश्वर येणपे, सोसायटी चेअरमन चनबसु येणपे, शंकर संगशेट्टी, विठ्ठल सुळे, मालकांना पाटील, महादेव भोजने, श्रीशैल्य येणपे, नंदकुमार पवार, हरिभाऊ राठोड, तम्माराया बुगडे, श्रीशैल गोडसे, दिलीप मुलाणी, तम्मा वाघमोडे,
सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार सुभाष पाटील  यांनी मानले
test banner